फलटण - १७ ऑक्टोबर २०२४
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या मातोश्री शकुंतला प्रल्हाद चव्हाण यांचे आज पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या.
तरडगाव पगार विभागाचे माजी तालुकामास्तर कै.प्रल्हाद धोंडीराम चव्हाण गुरुजी यांच्या पत्नी होत. शकुंतला प्रल्हाद चव्हाण तरडगावच्या माजी उपसरपंच, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण व अनिल चव्हाण यांच्या मातोश्री होत. अंत्यविधी आज दुपारी १२ वाजता तरडगाव ता.फलटण येथे होणार आहे.