फलटण प्रतिनिधी:- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण मुक्कामी दिनांक २१ रोजी होता दरम्यान फलटण नगर परिषदेमार्फत पालखीतळावर स्वच्छता करण्यात आली व सर्व परीसर अवघ्या काही तासातच स्वच्छ करण्यात आला.
दि. २१ रोजी रात्री १२ वाजल्यापासून पासून पालखी तळावरील स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले होते या कर्मचाऱ्यां मार्फत पालखी तळावरील स्वच्छता केली .आज सकाळी सहानंतर माऊलीचे प्रस्थान झाल्यानंतर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सर्व १५०कर्मचारी वर्ग २ स्वच्छता निरीक्षक ८ मुकदम१६ घंटागाड्या, ४ ट्रॅक्टर ट्रॉली, २ ट्रॅक्टर ड्रोजर इत्यादी साधनांचा वापर करून संपूर्ण पालखी तळ अवघ्या तीन तासात स्वच्छ करण्यात आला.
पालखी तळावरून सुमारे बारा ते पंधरा टन इतका कचरा संकलन करण्यात आला आहे, तसेच शहरातील विविध भागातील स्वच्छता सकाळी सहा ते दहा या वेळेत करून शहरांमधून सुमारे पंधरा टन कचरा संकलन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतर नगर परिषदेकडून उपलब्ध झालेले १००कर्मचारी, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे विद्यापीठ मधील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत १०० विद्यार्थी तसेच फलटण येथील मुधोजी कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेतील 100 विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे व शिस्तबद्धने स्वच्छतेसाठी सहभाग नोंदवला त्यामुळे विक्रमी वेळेत फलटणमधील शहरातील व पालखीतळावरील स्वच्छता करणे शक्य झाले. नगरपरिषदे कडून सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.