घर घर तिरंगा ही मोहीम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, कराडचे (सातारा ) पदाधिकारी करत असलेले प्रयत्न हे राष्ट्र प्रेम असून प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावून राष्ट्रप्रेम वाढण्यास मदत करावी असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप शहा यांनी काढले. ते कराड येथे घर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ता मेळावा प्रसंगी बोलत होते. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा पदाधिकाऱ्यांना देऊन अनुप शहा यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी अल्पसंख्यांक युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष निखिल शहा, भारतीय जनता पार्टी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, शहर सरचिटणीस प्रमोद शिंदे, प्रशांत कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वास्के, अल्पसंख्यांक मोर्चाचे शहराध्यक्ष नितीन शहा, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष विश्वजीत फुटाणे, रुपेंद्र कदम अल्पसंख्यांक मोर्चाचे कार्यकारिणी सदस्य उमर सय्यद, विवेक भोसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.