फलटण प्रतिनीधी:- गोल्ड लोणचे पैसे भरण्यासाठी चाललेल्या वृद्धाची पैशाची पिशवी हिसकावून चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमाराला शहरातील उघडा मारुती मंदिराजवळील मुथूट फायनान्स कंपनीचे ऑफिस समोर रविवार पेठ येथे फिर्यादी अशोक खंडेराव भगत (वय- ७० वर्षे, रा. मेहता हाईट्स रविवार पेठ, फलटण) हे गोल्ड लोणचे कर्ज भरण्यासाठी १ लाख २२ हजार रुपयांची कापडी पिशवी (बॅग) मध्ये घेऊन चालले असता त्यांच्या पाठीमागून आलेल्या काळा रंगाचे युनिकॉर्न मोटारसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याकडील पैशाची पिशवी हिसकावून चोरून नेण्याचा प्रयत्न करत अशोक खंडेराव भगत यांना जखमी केले सदर प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी शिंदे हे करीत आहेत.