फलटण प्रतिनीधी:- फलटण तालुका सकल धनगर समाज बाधव, फलटण यांच्यावतीने धूळदेव येथे मेंढपाळावर गंभीर हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ ३०७ नुसार गुन्हे दाखल करून अटक करणेबाबत पोलीस प्रशासन व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
धुळदेव ता. फलटण येथे दिनांक 31 रोजी मेंढपाळांना गंभीर मारहाण करण्यात आली त्या अनुषंगाने फलटण तालुका सकल धनगर समाज बांधव यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये असे म्हंटले आहे की, काल दि. ३१/७/२०२३ रोजी धुळदेव ता. फलटण येथे श्री. लक्ष्मण बिरा ठोंबरे, श्री. धुळदेव रामा नरुटे व श्री. सोमा साधु नरुटे रा.मु.पो.मुढाळे या मेंढपाळावर धुळदेव तालुका फलटण येथील काही समाजकंटकांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. सध्या गंभीर झालेला मेंढपाळ एका खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे.
या सर्व गोष्टींची पुरावे व्हिडिरेकॉर्डींग मध्ये आलेले आहेत. तरी सदरचे व्हिडीओ रेकॉर्डींग पाहून मेंढपाळ बांधवावर गंभीर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ ३०७ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी. सदर समाजकंटकावर व योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यास या संदर्भात यापुढचे आमचे आंदोलन तीव्र करण्यात येईल तरी तात्काळ उगीच कारण नसताना मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवरती गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन देताना फलटण तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.