Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उदघाट्न व 1000 मे. टन गोदामच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार संपन्न चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांची फलटण येथील राम पेट्रोलियमला भेट शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे फक्त पाट्या टाकाण्याचे काम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश

राष्ट्रवादी सहकार पॅनेलच्या ११ जागा बिनविरोध

जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात; जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माघार
टीम : धैर्य टाईम्स
11 seats of Nationalist Co-operation Panel unopposed
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलने 21 पैकी 11 जागा बिनविरोध जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. सहा सोसायटी मतदारसंघांसह एकूण 10 जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात असून त्यासाठी राजकीय रणनीती गतिमान होणार आहे. मात्र भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी निवडणुकीतून आपले अर्ज माघारी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलने 21 पैकी 11 जागा बिनविरोध जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. सहा सोसायटी मतदारसंघांसह एकूण 10 जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात असून त्यासाठी राजकीय रणनीती गतिमान होणार आहे. मात्र भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी निवडणुकीतून आपले अर्ज माघारी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रामराजे यांची शिष्टाई आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मंजूरीनंतर सहकार पॅनलने अर्ज माघारीच्या निर्णायक क्षणी खासदार उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी देऊन त्यांच्याविरोधातील सर्वच उमेदवारी अर्ज काढून घेतल्याने उदयनराजे बिनविरोध निवडून गेले. सत्ताधाऱ्यांविरोधात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे हे दंड थोपटून उभे राहिले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर त्यांचे पॅनल जाहीर होणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनीच स्वत:सह समर्थकांचे उमेदवारी अर्ज काढून घेतल्याने त्यांचा विरोध मावळल्याचे स्पष्ट झाले. मात्र स्वतंत्र पॅनेलची तयारी करणाऱ्या भाजप नेत्यांनी ऐन लढाईत शस्त्रे का म्यान केली, हे गुलदस्त्यातच राहिले.
आता सातारा, फलटण, खंडाळा, वाई, महाबळेश्वर हे विकास सोसायटी मतदारसंघ तसेच खरेदी विक्री संघ, कृषी प्रक्रिया, गृहनिर्माण, भटक्या जमाती, अनुसूचित जाती, औद्योगिक विणकर हे ११ मतदारसंघ बिनविरोध करुन सत्ताधारी सहकार पॅनलने बाजी मारली आहे. आता माण, कोरेगाव, जावली, खटाव, पाटण, कराड, महिला प्रवर्ग २ जागा, इतर मागास प्रवर्ग, नागरी बँका पतसंस्था या मतदारसंघांतील 10 जागांसाठी निवडणूक लागलेली आहे. या एकूण दहा जागांसाठी आता वीस उमेदवार रिंगणात असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांनी सांगितले .
विशेषत: सोसायटी मतदारसंघांमध्ये घमासान लढती पहायला मिळणार आहेत. कराड सोसायटी मतदारसंघामधून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विरुध्द ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर, खटावमधून नंदकुमार मोरे विरुध्द माजी आमदार प्रभाकर घार्गे, माणमध्ये मनोज पोळ विरुध्द शेखर गोरे, पाटणमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई विरुध्द सत्यजित पाटणकर, कोरेगावमध्ये शिवाजीराव महाडीक विरुध्द सुनील खत्री, जावलीत आमदार शशिकांत शिंदे विरुध्द ज्ञानदेव रांजणे या लढती लक्षवेधी ठरणार आहेत.

हे आहेत बिनविरोध संचालक...
खरेदी विक्री - आमदार मकरंद पाटील
कृषी प्रक्रिया - शिवरूपराजे खर्डेकर
गृहनिर्माण - खासदार उदयनराजे भोसले
भटक्या विमुक्त जमाती - लहू जाधव
अनुसूचित जाती जमाती - सुरेश सावंत
औद्योगिक व विणकर - अनिल देसाई
प्राथमिक कृषी पतपुरवठा गट मतदारसंघ
सातारा - आमदार शिवेंद्रराजे भोसले
फलटण - रामराजे नाईक-निंबाळकर
खंडाळा - दत्तानाना ढमाळ
वाई - नितीन पाटील
महाबळेश्वर - राजेंद्र राजपुरे

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER