Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे

...तर आम्ही राजकीय संन्यास घेवून टाकू

जावलीच्या भूमिपुत्रांनी शिवेंद्रसिंहराजे यांना दिला निर्वाणीचा इशारा
टीम : धैर्य टाईम्स
... so we will retire politically
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सर्वाधिक हॉट झालेल्या ‘जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा’ मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते आ. शशिकांत शिंदे यांना सोपी करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. ‘बाबा तुमच्यासाठी काहीही करु; पण आता माघार घेणार नाही.

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सर्वाधिक हॉट झालेल्या ‘जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा’ मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते आ. शशिकांत शिंदे यांना सोपी करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. ‘बाबा तुमच्यासाठी काहीही करु; पण आता माघार घेणार नाही. तुम्ही माघार घ्यायला दबाव आणला तर आम्ही राजकारण सोडू देवू,’ असा निर्वाणीचा इशारा ज्ञानदेव रांजणे, वसंतराव मानकुमरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तब्बल २८ मतदारांनी दिल्याने शिवेंद्रसिंहराजेही हतबल झाले आहेत.
आ. शशिकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी स्वत: शिवेंद्रसिंहराजे यांना शब्द टाकला. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांनी थेट रांजणे, वसंतराव मानकुमरे यांच्यासह २८ मतदारांना गाठले आणि त्यांच्याबरोबर बैठक घेतली. शिवेंद्रसिंहराजे यांनी मोठ्या प्रमाणावर बैठकीत रांजणे, मानकुमरे यांच्यावर दबाव आणला. जिल्ह्यात सहकारमंत्री, गृहराज्यमंत्री निवडणूक लढवत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांनी आणि उमेदवारांनी कोणाचेच ऐकलेले नाही, अशावेळी आमच्यावरच फक्त दबाव का आणला जातोय..?, असा सवाल जावलीच्या भूमिपुत्रांनी शिवेंद्रसिंहराजे यांना केला. ‘आम्ही तुमच्यासाठी काहीही करु, पण यावेळी माघार घ्यायला लावू नका,’ अशी विनंती सर्व मतदारांनी एकमुखाने शिवेंद्रसिंहराजे यांना केली. ‘आमच्यावर तुम्ही आणखी दबाव आणला तर आम्ही राजकीय संन्यास घेवून टाकू,’ असे रांजणे यांनी सांगून टाकले आणि सर्व मतदारांनीही तीच भूमिका घेतली. ‘आम्ही गावात आणि तालुक्यात जावून काय सांगायचे आणि लोकांना आम्ही कसे तोंड दाखवायचे,’ असा सवालही मतदारांनी शिवेंद्रसिंहराजे यांना केला.
‘खा. शरद पवारसाहेब यांनी आपल्याला माघार घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे आपल्याला त्यांचे ऐकले पाहिजे,’ असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारांना सांगितले. ‘माझ्या विनंतीचा विचार करा,’ अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारांना साद घातली. मात्र, मतदारांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की जिल्हा बँक ही फक्त एकच निवडणूक नाही की  तिथे माघार घेतली पाहिजे. पुढे प्रत्येक निवडणुकीत आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अन्य निवडणुकांमध्येही आम्हाला त्रास होणार आहे. ‘गेली दीड महिना आम्ही घरापासून बाहेर आहोत. आम्ही गावातील लोकांना शब्द दिलाय की आम्ही ज्ञानदेव रांजणे यांच्याच बाजूने राहणार आहोत. त्यामुळे आम्ही काही वेगळे केले तर लोक आम्हाला माफ करणार नाहीत. आम्हाला गावात आणि तालुक्यात फिरायला जागा राहणार नाही. आम्ही पैसे घेतले, आम्ही विकले गेलो, अशाप्रकारचे आरोप आमच्यावर होतील. दीड महिना बाहेर जावून शेवटी तुम्ही काय केले. हेच करायचे होते तर इतके दिवस बाहेर का गेला, असे अनेक प्रश्न आम्हाला जनता विचारेल. आम्ही त्यांना कोणत्याप्रकारे उत्तर देवू शकतो हे तुम्हीच सांगा,’ अशा शब्दात सर्वच मतदारांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर आपल्या भावना मांडल्या.
दरम्यान, मतदारांनी एकजुटीने उपस्थित केलेले प्रश्न आणि व्यक्त केलेल्या निर्धारापुढे शिवेंद्रसिंहराजेही निरुत्तर झाले. मतदारांना कितीही भावनिक साद घातली आणि त्यांच्यावर कितीही दबाव आणला तरी ते ऐकायला तयार होत नाहीत हे लक्षात आल्यावर शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीतून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जावलीचा निकाल आता मतपेटीतूनच लागणार आहे.

राष्ट्रवादीनेच शशिकांत शिंदेंना घेरले..!
वसंतराव मानकुमरे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये एका टेंडरमुळे मोठे वैर निर्माण झाले आहे. पूर्वीही अनेकवेळा शशिकांत शिंदे यांनी मानकुमरे यांना नामोहरम केले होते. मात्र यावेळी शशिकांत शिंदे यांना खिंडीत गाठण्याची पूर्ण संधी मानकुमरे यांना चालून आली आहे. ही संधी सोडण्याची मानकुमरे यांची तयारी नाही. त्यातच शशिकांत शिंदे यांना घेरण्यासाठी मानकुमरे यांना राष्ट्रवादीतूनच रसद मिळाली आहे. मानकुमरे यांना ज्यांनी टेंडर दिले होते ते नेते आणि ज्यांना जिल्हा बँकेचे चेअरमन व्हायचे आहे, अशा इच्छूक उमेदवारांनीच शशिकांत शिंदे यांचा कार्यक्रम पक्का केल्याची चर्चा आहे. कालांतराने त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. रांजणे आणि मानकुमरे हे दोघेही राष्ट्रवादीतच आहेत. त्यामुळे त्यांना कोणी कोणी रसद पुरवली असेल याचा शोध शशिकांत शिंदे यांना घ्यावा लागणार आहे.

एकाचवेळी मतदानासाठी मतदार प्रकट होणार..!
राजस्थान, गोवा, कर्नाटक अशा वेगवेगळ्या राज्यात गेलेले मतदार महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच्या सीमेच्या आत आलेल्या मतदारांना शिवेंद्रसिंहराजे यांनी गाठले असले तरी मतदारांनी पुन्हा आपला ठिकाणा बदलला आहे. मतदार कोणाच्या संपर्कात येण्यास तयार नाहीत. जावलीचे मतदार मतदानादिवशीच एकत्र येणार असून एकाचवेळी २८ जण मतदान करणार आहेत, अशी व्यूहरचना वसंतराव मानकुमरे आणि ज्ञानदेव रांजणे यांनी ठरवली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER