Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार : खा. उदयनराजे

टीम : धैर्य टाईम्स
District Bank to contest elections: Udayanraje
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातील सहकारामधील एक अग्रगण्य बँक आहे. या बँकेत फारसे राजकारण नाही, हे सांगायला बरं वाटतं म्हणण्यापेक्षा अभिमान वाटतो. या बँकेच्या माध्यमातुन हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना, सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे.

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातील सहकारामधील एक अग्रगण्य बँक आहे. या बँकेत फारसे राजकारण नाही, हे सांगायला बरं वाटतं म्हणण्यापेक्षा अभिमान वाटतो. या बँकेच्या माध्यमातुन हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना, सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे. सभासदांच्या आग्रह आणि इच्छेनुसार आम्ही याच मतदार संघातून बँकेची निवडणुक लढण्याचे निश्‍चित केले आहे. त्यास भरभरुन आशिर्वाद द्यावेत, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी करतानाच, सहकार चळवळीचा मुळ उद्देश बाजुला पडला आहे, शेतकऱ्यांपेक्षा स्वतःचा स्वार्थ साधण्याचा सध्या सुरु असलेल्या अनेक प्रयत्नामुळे शेतकरी सभासदांवर होणारा अन्याय एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करणार नाही त्याचा बंदोबस्त करु असा घणाघात केला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गृहनिर्माण आणि दुग्धविकास सहकारी संस्था मतदार संघातील मतदार सभासद-कार्यकर्त्यांचा मेळावा सातारा येथील हॉटेल लेक व्हयु येथे आज आयोजित करण्यात आला होता त्यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते. व्यासपिठावर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, सौ.गितांजली कदम, कराड नगरपरिषदेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, पंचायत समितीचे महाबळेश्‍वरचे माजी सभापती विजयराव भिलारे, कराडचे प्रा.आर.के.पाटील, आनंदराव गोळे, जयवंतराव बनसोडे, सौ.रत्नमाला निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
1932 साली सहकार कायदा आला आणि सहकार क्षेत्र एक चळवळ बनली. सहकारातील संघटीत प्रयत्नांमधुन शेतकरी बांधवांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी खऱ्या अर्थाने पाणीपुरवठा, गृहनिर्माण, दुग्धविकास, कुक्कुटपालन, शेळीपालन, ग्रामिण सहकारी पतसंस्था, सहकारी बँका, सोसायट्या, वाहतुक अश्या विविध संस्था उभारण्यात आल्या. एकमेका सहारूय करु अवघे धरु सुपथ असा विचार सहकाराच्या पाठीशी होता. परंतु अलिकडच्या काळात सहकाराच्या माध्यमातुन शेतकरी सभासदांच्या हिताचे उपदेश द्यायचे आणि करायचे मात्र स्वतःच्या फायद्याचे ही भावना शिरली. अनेक संस्था याच घातक स्वाहाकारी विचारातुन खाजगी झाल्या. सहकाराचे नेतृत्व व्यक्तीकेंद्रीत झाले. परिणामी अनेक संस्था,बँका अवसायानात गेल्या. त्या संस्थांवर अवलंबुन असलेल्यांचे हाल झाले.
खरतर ज्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली त्यांची पदे रद्द केली गेली पाहीजेत. त्यांना कोणत्याही संस्थांचे सभासद-संचालक म्हणून देखिल निवडणुक लढवण्यास बंदी कली गेली पाहीजे.
आपल्या विचारांची संस्था नाही तर मग त्यांचे निवडणुकितील मताचे ठराव अवैध ठरवुन, संकुचित वृत्तीने सहकार क्षेत्र आज वाकवले जात आहे, मताला अवैध ठरवलेल्यांना अवैध ठरवण्यापूर्वी संधी सुध्दा दिली नव्हती, त्याचा खेद वाटतो. ज्यांचे मतदानाचे ठराव अवैध ठरवले गेले त्यांनी असे कोणते पाप केले होते, त्यांनी कुणासारखा भ्रष्टाचार केला नव्हता किंवा त्यांची ईडीची चौकशी लागली नव्हती. परंतु फक्त आपल्या विचारांचा नाही म्हणून मतदानाला अपात्र हा पवित्रा आम्ही हाणुन पाडला.  अश्या प्रकारचा कोणताही अन्याय एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करु शकत नाहीत, त्याचा योग्य पध्दतीने सनदशीर मार्गाने बंदोबस्त करण्यास आम्ही आता मागे पुढे पहाणार नाही असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मतदार संभासदांना आपले निवडणुकीचे मत महत्वाचे आहेच कारण उदयनराजे स्वतःच्या एकटयाच्या मतावर निवडुन येवू शकत नाहीत हे खरं असलं तरी आपले वैचारिक मत आम्हाला अधिक महत्वपूर्ण आहे असे सांगीतले.
सहकारक्षेत्रामध्ये आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सारखे निस्पृह नेतृत्व अत्यंत गरजेचे आहे, असे नमुद करुन, कराड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक व गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी सांगीतले की, आपल्या विचारांच्या मतदार सभासदत्वाला येणाऱ्या निवडणुकी मधुन बाद करण्याच्या अनेक चाली काही प्रवृत्तीनी खेळल्या. परंतु खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भेासले यांच्या खंबीर पाठींब्यामुळे, सहनिबंधक, कोल्हापूर यांचेकडून अश्या बाद केलेल्या मतदार व्यक्तींचा हक्क पुन्हा आपण मिळवलेला आहे. या व अश्या अनेक कारणांमुळे सभासदांच्या उज्वल भविष्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावर असलेच पाहीजेत असे मत मांडले.
विजयराव भिलारे यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भेासले यांचे व्यक्तीमत्व सर्वमान्य आहे, त्यामुळे त्यांच्या मार्गात कोणी खोडा घालेल असे वाटत नाही, तथापि महाबळेश्‍वर तालुक्याची आमची साथ महाराजसाहेबांच्या पाठीशी कायम आहे. महाबळेश्‍वर तालुक्यात मध उत्पादन होत असते. मधुमक्षिकापालन आणि मध गोळा करणाऱ्या संस्थांना येथुन पुढील काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेने आर्थिक पाठबळ देणेकामी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मिळवून द्यावे अशी मागणी केली.
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील म्हणाले, आदर्श बँकेवर महाराजसाहेबांच्या मुळे एक वेगळा वचक आहे, त्यामुळेच महाराजसाहेब यांच्या गृहनिर्माण आणि दुग्ध विकास सोसायटी मतदारांचा त्यांना भरभक्कम पाठींबा आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजें सारखे राजकारण विरहित नेतृत्व दुसरे कोणते असेल असे वाटत नाही, त्यांच्या साठी पडेल ती जबाबदारी आपण सक्षम पार पाडणार आहोत असे स्पष्ट केले.
प्रास्ताविक, सुत्रसंचालन  आणि आभार शिरिष चिटणीस यांनी मानले. यावेळी सातारा जिल्हयातील बहुसंख्य मतदार, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मनोगताच्या वेळी कार्यकर्त्यांनी जयघोष केला.
या वेळी, काका धुमाळे, बाळासाहेब ननावरे, नानासाहेब शिंदे, सुनील काटकर, सुनील सावंत, डॉ.महेश गुरव, फिरोजतात्या शेख, ऍड.विनित पाटील, ऍड.अंकुश जाधव, ऍड.विकास पवार, रणजीत माने, संग्राम बर्गे, चंद्रकांत भोसले, बाळासाहेब राक्षे, लक्ष्मण कडव, जयवंत पवार, इ.उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER