Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनिानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले ध्वजवंदन - सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार - पालकमंत्री शंभूराज देसाई शिंपी समाज महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर : अध्यक्षपदी श्रीमती सुलभा मोहटकर तर सचिवपदी सौ. रेखा हेंद्रे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया थाटामाटात साजरी होणार : विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा ता. खंडाळा यांच्या वतीने श्रामनेर बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन

पाचगणी कोविडमुक्त करण्यास पालिका सरसावली

घरोघरी आरोग्य पथके जाऊन करताहेत तपासणी; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन 
टीम : धैर्य टाईम्स
कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव तसेच लोकांच्या बेफीकीरपणामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन जोरात फैलावतोय. बाधित रुग्णांचे प्रमाण दररोज वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली जाणार असून, काही लक्षणे दिसून आल्यास अशा लक्षणे असलेल्यांची नावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देऊन त्यांची तपासणी करून पाचगणी शहरात वाढणार्‍या कोरोनाला प्रतिबंध घातला जाणार आहे.

पाचगणी : कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव तसेच लोकांच्या बेफीकीरपणामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन जोरात फैलावतोय. बाधित रुग्णांचे प्रमाण दररोज वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली जाणार असून, काही लक्षणे दिसून आल्यास अशा लक्षणे असलेल्यांची नावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देऊन त्यांची तपासणी करून पाचगणी शहरात वाढणार्‍या कोरोनाला प्रतिबंध घातला जाणार आहे. याकरिता आपल्या दारात येणार्‍या आरोग्य कोविड दूतांना आपली योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पाचगणीकर नागरिकांना केलं आहे.

पाचगणी शहरात सध्या नव्या कोविड स्ट्रेनने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्याला रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषदेने त्रिसूत्री आरोग्य मोहीम हाती घेतली आहे. याबाबत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन आरोग्याची त्रिसूत्री मोहीम राबवली जाणार आहे. याकरिता दहा आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. तर यामध्ये आरोग्य सेविका यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. 

ही आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हल तपासणार आहेत.  मोहिमेंतर्गत पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक प्रभाग वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणी पथकात तीन आरोग्य दूत असणार आहेत. या येणार्‍या आरोग्य कोविड दूतांना आपल्या आरोग्याची योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले आहे. 

या अगोदर पाचगणी शहरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंंतर्गत शहरातील सोळा हजार नागरिकांचे ट्रेकिंग, ट्रेसिंग, पाचगणी नगरपरिषदेने कोरोनाला हद्दपार करण्याकरिता आता ‘फोर टी’ हा उपक्रम राबविला आहे. त्याच धर्तीवर आता पुन्हा पर्यटननगरी कोरोनामुक्त करण्याकरिता पालिकेने कंबर कसली आहे. याकरिता वॉर्ड व प्रभागनिहाय आरोग्य पथके घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची ऑक्सिजन लेव्हल व इतर आजारांची माहिती घेत लक्षणेग्रस्त रुग्णांची माहिती आरोग्य केंद्रात दिली जाणार असून त्यांच्याद्वारे उपचार व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे या मोहिमेची तपासणी अत्यंत काळजीपूर्वक केली जात असून, प्रत्येक नागरिकाचे यास सहकार्य अपेक्षित असून, या तपासणीची ऑनलाईन माहिती शासनास दिली जाणार आहे. 

 
पालिकेची अनोखी ‘फोर टी प्लॅन’ मोहीम...
पाचगणी नगरपरिषदेने या अगोदर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंंतर्गत अनोखी ‘फोर टी प्लॅन’ मोहीम ट्रेसिंग, ट्रेकिंग, टेस्टिंग, ट्रिटिंग) राबवली असल्याने आत्ताची मोहीम राबविणे अत्यंत सुकर होईल. तसेच कोरोना रोखण्यास पालिकेला या माध्यमातून नक्कीच यश येणार आहे. 

पाचगणी शहरात सध्या 58 मायक्रो कंटेन्मेंट झोन कार्यरत असून 93 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. आजअखेर 157 कंटेन्मेंट झोन झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण बाधित रुग्ण 458 झाले आहेत. 

 
कोविडमुक्त पाचगणी शहर करण्याकरिता सर्व पाचगणीकर शहरवासियांनी यास प्रतिसाद देत सहकार्य करावे, असे अवाहन करीत लवकरच पर्यटननगरी पुन्हा कोविडमुक्त करण्याचा मनोदय आहे. 
-  गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, पाचगणी नगरपरिषद. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER