गुणवरे ता . फलटण येथे शनिवार दि.२५ रोजी येथील गुणवरे विकास सोसायटीच्या हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दोशी गुणवरेकर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे देण्यात आली आहे
फलटण येथील दोशी गुणवरेकर चॅरीटेबल ट्रस्ट, जनसेवा डायग्नोस्टीक सेंटर, माऊली फौंडेशन मुंबई, लायन्स मुधोजी चॅरीटेबल आय हॉस्पीटल, फलटण ब्लड बँक, जैन सोशल ग्रुप आणि गुणवरे ग्रामपंचायत आदी संस्थाच्या संयुक्त विद्यमाने सदरचे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले असुन या शिबिरादरम्यान मोफत चेष्मे वाटप, आणि रक्तदान शिबीर आयोजित केले आहे
शिबीराचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांचे हस्ते होणार आहे. या प्रसंगी एमडी मेडीसिन डॉ .जे.टी पोळ, डॉ. राजस गांधी, डॉ. कल्याण नाळे, बालरोगतज्ञ डॉ. गुंजन गांधी, डॉ.अमोल नाळे, डॉ. निखिल गावडे, सर्जन डॉ.भारत पोंदुकले, दंतरोग तज्ञ डॉ. अशोक व्होरा, डॉं. चेतन गुदेंचा, डॉ. श्रीकांत गावडे, डॉं. मनोज सौ प्रज्ञा गांधी अस्थिरोगतज्ञ डॉ. प्रविण आगवणे, डॉ.तेजस गांधी, स्त्रीरोगतज्ञ डॉ. संतोष गांधी, डॉ. अलोक गांधी, नेत्ररोगतज्ञ डॉ . इंद्रायणी नक्षणे, डॉ,अमृता कामठे पॅथॉलॉजीतज्ञ डॉ. दिव्या रसाळ, त्वचारोग तज्ञ डॉ. चैत्राली खोमणे ब्लड बँकच्या वतीने डॉ. श्रीकांत करवा जनरल फिजिशियन डॉ. मिलिंद दोशी, ऋषीकेश राजवैद्य, हेमंत व सौ.आश्विनी अब्दागिरे, सिद्धांत दोशी, गणेश शिंदे ,त्रिंबक गावडे, तुकाराम गावडे, सागर तेली, वर्षा नाळे, सुनिल गावडे, संदिप नाळे, अभिजीत गावडे, जयवंत गावडे आदी उपस्थित राहणार आहेत.
गुणवरे पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी माहिला पुरुष ग्रामस्थांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगेशशेठ दोशी यांनी केले आहे.


















