Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर

श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी -


श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली असून अध्यक्ष पदी अनिल मच्छिंद्र भोईटे व उपाध्यक्ष पदी सौ.अनिता दत्तात्रय पवार (पूर्वीचे नाव अनिता गणपत रणवरे),तसेच सचिव पदी सौ.माधुरी ज्ञानेश्वर जाधव मुख्याध्यापिका तथा पदसिद्ध सचिव ,तसेच खजिनदार पदी नंदू शेठ नामदेव शेगर यांची निवड करण्यात आली आहे.


यावेळी पदभार स्वीकारताना अनिल भोईटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्याचा मुख्य उद्देश शाळा आणि तिच्या माजी विद्यार्थ्यांमधील नाते पुन्हा मजबूत करून शालेय विकासाला गती देणे हा आहे असे मत नवनियुक्त अध्यक्ष अनिल भोईटे यांनी व्यक्त केला.


महाराष्ट्र शासनाने १ ऑक्टोबर २०२५ च्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व खासगी शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ सक्तीने स्थापन करण्याचा आदेश दिला आहे,शासनाने नमूद केलेले प्रमुख उद्देश शालेय दर्जा उंचावणे, समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवून शाळेचा/विद्यालयाचा दर्जा उंचावणे शैक्षणिक विकासात सहभाग, माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या शैक्षणिक विकासात थेट सहभागी करून घेणे, ग्रामीण व शहरी भागात शिक्षणाचा दर्जा समान रीतीने उंचावण्यास मदत करणे, माजी विद्यार्थ्यांचे शाळेशी असणारे ऋणानुबंध दृढ करणे,माजी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशापासून सध्याच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी माजी विद्यार्थ्यांचे आपल्या गावाशी,मातीशी संबंध दृढ करणे शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शाळांची गुणवत्ता सुधारणा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे 


यासाठी असून श्री जितोबा विद्यालय जिंती आपल्या भागातील तथा पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना एका मंदिराप्रमाणे असून शाळेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले.


यावेळी शाळेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून“शाळेतून घडून बाहेर पडलेले विद्यार्थी पुन्हा शाळेकडे वळोत, तिच्या प्रगतीत हातभार लावोत आणि आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी” यासाठी जिंती सह पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी यासाठी तण मन धनाने मदत करतील असा विश्वास व्यक्त केला.


रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती येथे नुकतीच माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली, रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती ता. फलटण जि.सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या व शासनाच्या ध्येय धोरणानुसार माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र रणवरे, प्रकाश रणवरे, महादेवराव रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


श्री जितोबा विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून अनिल भोईटे उपाध्यक्ष म्हणून अनिता रणवरे सचिव म्हणून सौ. माधुरी जाधव खजिनदार नंदकुमार शेगर तर सदस्य म्हणून ताराचंद्र आवळे, शरदराव रणवरे यशवंत खलाटे पाटील ,नंदकुमार भोसले सारिका खलाटे(घाडगे),विजय मोरे, ज्योती पवार(दिवेकर),सुनिता शिंदे(बाबर) रोहिणी जाधव(अहिरेकर)दिपा गुजर(चव्हाण) रवींद्र गिरी, राणी उर्फ वैशाली रणवरे(बळे) अलका रणवरे(कारंडे),अनिकेत रणवरे, नवनाथ रणवरे, नंदकुमार रणवरे, नितीन रणवरे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, दीप प्रज्वलन, वडाच्या रोपाचे पूजन व पाणी घालून मेळाव्यास सुरुवात झाली. 


ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार मुख्याध्यापिका सौ. माधुरी जाधव यांनी मानले. यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या जमदाडे, अंकुश सोळंकी, शाहीन हन्नुरे,अमोल जाधव,अर्चना सोनवलकर,मधुकर जगताप,घाडगे,यांनी प्रयत्न केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER