फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यातील मौजे निंभोरे येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ओट्याजवळ काल शनिवारी दिनांक १८ मार्च रोजी निंभोरे गावातील श्री.राजे राजवल्ली पिरसाहेब दर्गा यात्रेच्या निमित्ताने कुस्ती स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तेथे दोन गटात भांडणे झाली याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, एका दाखल गुन्ह्यात यातील फिर्यादी हे कुस्ती पहात असताना कुस्त्या खेळायचे तुमचे काम नाही असे आरोपी फिर्यादी यांना म्हणाले या कारणावरून त्यांच्या मध्ये वाद निर्माण झाला तेव्हा आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांना लोखंडी, गज, सुरा व काठी अशा हत्यारांनी मारहाण करून जखमी केले. व फिर्यादीस तुमच्या कुस्त्या खेळायचे काम नाही असे जाती वाचक बोलले जातीवाचक बोलून त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच 11 डी एफ 45 75 हिच्यावर दगड मारून नुकसान केले असलेचा जबाब दवाखान्यामध्ये उपचार घेत असताना दिला असून सदरचा गुन्हा एम. एल. सी. जबाब वरून दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपी 1) विजय शिवाजी जाधव 2)निलेश मदने 3)नितीन मदने 4)प्रदीप जाधव 5)शिवाजी जाधव 6)बापू वाघमोडे 7)सुरेश पिसाळ 8)अजय भंडलकर 9)किरण वसव सर्व (राहणार निंभोरे ता.फलटण,जि.सातारा) यांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत.
तर दुसऱ्या परस्परविरोधी दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक 18 रोजीचे सायंकाळी 5.20 वाजण्याच्या दरम्यान निंभोरे गावातील श्री राजवल्ली पीर साहेब दर्ग्याचे शेजारी असले पालखीतळावरील कुस्त्याचे आखाड्यात गावातील 1)कल्पेश पांडुरंग कांबळे, 2)ऋषिकेश भाऊसो कांबळे, 3)विशाल बापू घाडगे, 4)योगेश बाळासो कांबळे, 5)अमित सतीश कांबळे, 6)सौरभ विजय कांबळे (सर्व राहणार निंभोरे) यांनी आखाड्यात येऊन गोंधळ घालून किशोर पोपटराव मोरे यांच्याकडे कुस्त्याचे इनाम देण्यास असलेली ७० हजार रुपये रकमेची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन दगड फेकून मारून निलेश यास जखमी करून पळून गेले अशी दाखल फिर्याद नुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.