पिंपरद ता. फलटण येथे गाडी मागण्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने हल्ला झाला झाल्याची माहिती फिर्यादी धीरज रामदास कापसे वय २५, यांनी दिली आहे. यासंबंधी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
यासंबंधी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथून मिळाले माहिती अशी, पिंपरद येथील फिर्यादी धीरज रामदास कापसे यांनी संशयित आरोपी रोहित तानाजी शिंदे वय २६, याने तुला लय मस्ती आलीय काय म्हणत रोहित शिंदे व एका अज्ञात व्यक्तीने धीरज रामदास कापसे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यावेळी फिर्यादी यांचा भाऊ सुरज भांडण सोडवण्यास आले असता त्यालाही लाथाबुक्यानी मारहाण करण्यात आली. सुरज याच्या गळ्यातील तो 3 तोळ्याची सोन्याची चैन आरोपी रोहित शिंदे यांनी तोडून घेतल्याची घटना मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास पिंपरद येथे घडली असून या हल्ल्यात धीरज कापसे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंबंधीचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.