फलटण प्रतिनिधी:- कुरवली खुर्द येथे भांडणाच्या कारणातून मारहाण करून दलित महिलेस व अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणात सकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा तीन जणांच्या विरोधात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांची मुलगी दि. २२ रोजी दुपारी ११:४५ वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी आली असता रडु लागल्याने फिर्यादी यांनी तुला काय झाले असे विचारणा केली असता तीने आपल्या गावातील संशयित आरोपी अल्पवयीन मुलगा हा मला सारखा शाळेत येताना जाताना पाठीमागुन येवुन मला तु आवडतेस मी तुला घेवून जाणार आहे असे म्हणून दररोज मला त्रास देते आहे असे सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला व त्यांचे पती असे मिळुन अल्पवयीन मुलाच्या घरी समजावण्याकरीता गेले असता अल्पवयीन मुलाच्या आई व बहिण या दोघीच त्यावेळी घरी होत्या त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांचे म्हणणे ऐकून न घेता तुमचीच मुलगी बाद आहे मी तुम्हालाच गुतवते असे म्हणून शिवीगाळ चालु केली.
त्यानंतर दिनांक २३ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची लहान मुलगी आश्रम शाळेसमोर खेळत असताना झालेल्या भांडणावरुन चिडुन जावुन फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलाची बहिण लहान मुलीला हाताने मारहाण करु लागल्याने फिर्यादी व त्यांची मोठी मुलगी हिस वाचवण्याकरीता गेले असता त्या ठिकाणी अल्पवयीन मुलगा तिची आई व बहीण यांनी मिळुन फिर्यादी व त्यांची मुलगी हिला हाताने मारहाण करु लागले असता त्यामध्ये फिर्यादी यांची मोठी अल्पवयीन मुलगी हिला अल्पवयीन मुलाने वाईट हेतुने तिच्या शरीराला हात लावत तिचा हात धरला व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व तुम्हाला काय मस्ती आली का. तुम्हाला दाखवु का आम्ही काय करू शकतो तुम्हाला गुतवायला वेळ लागायचा नाही अशी धमकी दिली अशी फिर्याद ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी महिलेने दिनांक २४ रोजी रात्री उशिरा दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून इतर दोन जणांच्या विरोधात विनयभंग व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.