या पूर्वीपासूनच विविध फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेला गिरवी ता. फलटण येथील "नटवरलाल" दिगंबर रोहिदास आगवणे याच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या संबंधी माहिती अशी, दिनांक 14/12/2016 रोजी ते 8/9/2022 या कालावधीत 1) मौजे गिरवी तालुका फलटण गावचे हद्दीतील सिटी सर्वे नंबर 599 क्षेत्रफळ446.66 चौरस मीटर जागा व त्यावरील ग्रामपंचायत मालमत्ता मिळकत क्रमांक 11 82 अन्वये नोंद असलेली इमारत, 2) मौजे गिरवी तालुका फलटण गावचे हद्दीतीलगट नंबर 111/अ, क्षेत्र 0 हेक्टर 70 आर (इंडस्ट्रियल एन ए लँड ), 3) मौजे गिरवी तालुका फलटण गावच्या हद्दीतील गट नंबर 11 23 शेत्र एक हेक्टर 27 आर (इंडस्ट्रियल एन.ए. लँड), 4) मौजे नांदल तालुका फलटण गावच्या हद्दीतील गट नंबर490/2 प्लॉट नंबर 4 क्षेत्रफळ चौरस मीटर, 5) मौजे नांदल तालुका फलटण गावचे हद्दीतील गट नंबर 490/2 प्लॉट नंबर 20 क्षेत्रफळ 219. 42 चौरस 6) मौजे नांदल फलटण गावच्या हद्दीतील गट नंबर 490/ 2 प्लॉट नंबर 34 शेत्र 222. 95 चौरस मीटर 7) मौजे नांदल तालुका फलटण गावचे हद्दीतील गट नंबर 490/2 प्लॉट नंबर 51 शेत्र 222. 95 चौरस मीटर, मधील मिळकती ह्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गिरवी ता. फलटण या बँकेत तारण असल्याचे माहित असताना देखील आरोपीने स्वतःचे आर्थिक फायद्या करता सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गिरवी ता.फलटण या बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करून ती स्टेट बँक ऑफ पटियाला सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गोडोली ता.जिल्हा सातारा या बँकेत सादर करून फिर्यादी व्यवस्थापक असलेल्या बँकेची फसवणूक आरोपी दिगंबर रोहिदास आगवणे यांनी केली आहे म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गिरवी चे व्यवस्थापक किरण शंकर डुकरे यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे करीत आहेत.