Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

हलगर्जीपणा कराल तर कारवाई करू !

शहर पोलीस ठाण्यात येऊन गृहराज्यमंत्री यांचा पोलीस निरीक्षकांना इशारा
टीम : धैर्य टाईम्स
If you are negligent, we will take action!
सहा-सहा वर्ष एका पोलीस ठाण्यात कर्मचारी ठेवण्याचे कारण काय? महिना झाला गुन्हा दाखल होऊन तरी तुम्हांला गुंड सापडत नाही. काय काम करता तुम्ही आणि तुमचे कर्मचारी? असा प्रश्न गृहराज्‍यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी उपस्थित करुन नगरसेवक विनोद (बाळू) खंदारे याच्या तपासात हलगर्जीपणा केल्याने तुमच्यावर कारवाई करु, असा जणू इशाराच दिला आहे.

सातारा : सहा-सहा वर्ष एका पोलीस ठाण्यात कर्मचारी ठेवण्याचे कारण काय? महिना झाला गुन्हा दाखल होऊन तरी तुम्हांला गुंड सापडत नाही. काय काम करता तुम्ही आणि तुमचे कर्मचारी? असा प्रश्न गृहराज्‍यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी उपस्थित करुन नगरसेवक विनोद (बाळू) खंदारे याच्या तपासात हलगर्जीपणा केल्याने तुमच्यावर कारवाई करु, असा जणू इशाराच दिला आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपुर्वी सातारा पोलीस आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नगरसेवक विनोद (बाळू) खंदारे याच्यावर दाखल असलेले गुन्हे, पोलीस प्रशासन राजकीय दबावापोटी करीत असलेले कामकाज या विषयी उदयनराजेंनी पत्रकार परिषदेतून पोलीस दलाच्या कामकाजाविषयी शंका व्यक्त केली होती. दरम्यान राज्याचे गृहराज्‍यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी बहुधा उदयनराजेंनी मांडलेल्या शंकेची शहनिशा करण्यासाठी आज पोलीस ठाणे गाठले.
आज सकाळी अचानक गृहराज्‍यमंत्री देसाई दुचाकीवरुन सातारा शहर पोलीस ठाण्यात गेले. यावेळी पोलिस ठाण्यात कोणकोण उपस्थित आहेत? कामकाज कसे सुरु आहे? पोलिसांचा तपास कसा सुरु आहे? प्रलंबित गुन्ह्यांचा तपास कुठ अडला आहे? याची सरबत्ती करत गृहराज्यमंत्र्यांनी पोलिस ठाणे फैलावर घेतले. जे अधिकारी उपस्थित नाहीत त्यांना तात्काळ बोलावण्यात आले.
सुरुवातीला पोलिस ठाण्याची पाहणी करत असताना ज्या पोलिसांच्या डोक्यावर टोपी नाही त्यांना खडेबोल सुनावले. अंगावर वर्दी असताना डोक्यावर टोपी घालण्याची ताकीद पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस ठाण्यात अधिकारी किती, कर्मचारी संख्या किती याची माहिती घेतली. अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना तात्काळ बोलावण्यात आले. याचवेळी क्राईमची माहिती घेत किती गुन्हे पेंडीग आहेत? तपास अर्ध्यावर किती प्रकरणांचा आहे? याची माहिती घेतली.
पेलिस ठाण्याचे कारभारी पोनि भगवान निंबाळकर पोलिस ठाण्यात आल्यानंतर ना.शंभूराज देसाई यांनी ‘सातारा शहर पोलिस ठाणे गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत’ असल्याचा जाब विचारताच पोलिसांचे तत पप झाले. दीड महिन्यांपूर्वी सातार्‍यातील बाळू खंदारे राडा प्रकरणाला हात घालत ‘क्रिमीनल रेकॉर्ड असणारा गंभीर गुन्ह्यातील संशयित गुन्हेगार का सापडत नाही?’ या गुन्ह्याचे तपासी अधिकारी कोण आहेत? असा सवाल केला. यावेळी तपासी अधिकारी पोनि वंदना श्रीसुंदर यांनी तपासामध्ये मुख्य संशयित आरोपी वगळता इतरांना अटक केली असल्याचा खुलासा केला. तसेच सरकार पक्षाने न्यायालयात अटी, शर्थीवर जामीन देण्यास सांगितल्याने इतर संशयितांना जामीन झाल्याचे श्रीसुंदर यांनी सांगितले.
यावेळी ना.शंभूराज देसाई म्हणाले, विधी न्याय विभागाकडून त्याबाबत माहिती घेतली जाईल. मात्र मुख्य संशयित आरोपी अजून का पकडला गेला नाही? शहर पोलिसांचे असेच काम चालत राहिले तर मला अ‍ॅक्शन घ्यावी लागेल. ही शेवटची संधी आहे. न्यायालयातून याबाबत वेगळी माहिती समोर आली तर खंदारे प्रकरणात तपासी अधिकार्‍याची चौकशी केली जाणार. येत्या 15 दिवसात सातारा शहरातील कायदा,सुव्यवस्था कडक झाली पाहिजे. अन्यथा, शहर पोलिसांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे शहर पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांनाही विविध सूचना दिल्या.
एसडीपीओ आंचल दलाल यांच्याबाबतही ना.शंभूराज देसाई यांनी समाचार घेतला. गृहराज्यमंत्री वेळोवेळी शहर पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्या आतापर्यंत एकदाही इथे आलेल्या नाहीत. तसेच त्या रस्त्यावरही कधी दिसत नाहीत. त्या ऑन ड्युटी आहेत की नाहीत? त्या रजेवर आहेत का? याची काही माहिती नसते. आता लगेच त्यांचे लोकेशन घ्या, वायरलेसवर विचारा. दलाल यांचे असे काम चालणार नाही. ‘दिस इज नॉट फेअर’ असा निरोप त्यांना कळवण्यास सांगण्यात आले.
वायसी कॉलेज परिसरात असलेल्या निर्भया चौकीचा कारभार संशयास्पद असल्याची माहिती गृहराज्यमंत्री यांना देण्यात आली. याठिकाणी कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचारी गुंडांचे, गुंडांच्या मुलांचे वाढदिवस चौकीतच केक कापून फोटोशूट करत आहेत. चौकीतीलच पोलिसांची ‘चमकोगिरी’ होत असून त्यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी झालेल्या तक्रारीत सुरुवातीला अरेरावीची भाषा वापरल्याचे सांगण्यात आले. याबाबत जो फोन झाला आहे त्याचे रेकॉर्डिंग समोर आले तर पोलिसाने वापरलेल्या भाषेजी पोलखोल होईल, अशी माहिती देण्यात आली. यावर लवकरच ‘निर्भया चौकीची झाडाझडती घेतली जाईल,’ अशी माहिती गृहराज्यमंत्री यांनी दिली. दरम्यान मंत्री देसाई यांनी नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याच्‍यावर दाखल असलेल्या गुन्‍ह्‍यांची माहिती मागितली असता नियुक्त कर्मचा-यास व्यवस्थित सांगता न आल्याने देसाईंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. दरम्यान, सुमारे एक तासभर पोलिसांची झाडाझडती झाल्याने पोलिसांची अक्षरश: तारांबळ उडाली.
देसाई म्हणाले खंदारेवर गुन्हा दाखल असल्याचे माहिती नाही. एका पोलीस ठाण्यात सहा वर्ष राहून देखील रेकाॅर्डवरील गुन्हेगाराची माहिती देऊ शकत नाही कर्मचारी. अधिकारी सांगतात १८ गुन्हे पोलीस कर्मचारी सांगतात १२ गुन्हे, सहा गुन्हे लपविण्याचे कारण काय? असे देसाई यांनी म्हणताच अधिकारी यांनी संबंधित विषय सावरुन घेत ते सहा गुन्हे प्रतिबंधात्मक विषयाचे असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER