सातारा दि. 9 : सातारा जिल्ह्यात 19 ते 28 सप्टेंबर कालावधीत गणेशोत्सव व 28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात 23 सप्टेंबर व 28 सप्टेंबर 2023 या दोन्ही दिवशी होणाऱ्या गणेश मूर्ती विसर्जना संबंधाने सातारा जिल्ह्यातील सर्व पारंपारिक गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर दोन्ही बाजूस कोणत्याही वाहनास पार्किंग करण्यास मनाई आदेश पोलीस अधीक्षक्षक समीर शेख यांनी जारी केले आहे.