फलटण प्रतिनिधी : माढा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण येथील मंगळवार पेठ येथे रविवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता प्रचार दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ.जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण नगर परिषदेचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय (आठवले गट ) राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीचे भाजपचे माढा लोकसभा मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एकूणच मतदार प्रचारात आघाडी घेतल्याची दिसून येत आहे.
रविवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता मंगळवार पेठ येथे प्रचार दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाजप व महायुतीतील सर्वं घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.