पंकज अरुण शिंदे (वय २७, रा. तुळजाभवानी कॉम्पलेक्स, पहिला मजला, फ्लॅट नंबर एक, राजवाडा, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच ११ - बीएम ७0१८) बुधवार, दि. १0 रोजी रात्री नऊ वाजता ते राहत असलेल्या ठिकाणी पार्क केली होती.
सातारा : सातारा येथील राजवाडा परिसरात पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पंकज अरुण शिंदे (वय २७, रा. तुळजाभवानी कॉम्पलेक्स, पहिला मजला, फ्लॅट नंबर एक, राजवाडा, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच ११ - बीएम ७0१८) बुधवार, दि. १0 रोजी रात्री नऊ वाजता ते राहत असलेल्या ठिकाणी पार्क केली होती. मात्र, गुरुवार, दि. ११ रोजी सकाळी सात वाजता दुचाकी त्यांच्या जागी नव्हती. याप्रकरणी पंकज शिंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करत आहेत.