फलटण प्रतिनीधी:- रविवारच्या बाजाराच्या दिवशी भर बाजारपेठेत कोयत्याचा व तलवारीचा धाक दाखवून दुकानदाराला लुटण्याचा प्रकार फलटण शहरात दिवसाढवळ्या घडला असून यावेळी २५ हजार रुपये लुटण्यात असून याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २४ रोजी दुपारी ४:४६ वाजण्याच्या दरम्यान रविवार बाजाराचा दिवस असल्याने दिवसभर मोठी गर्दी होती. फलटण शहरात मध्यवर्ती आणि बाजार पेठेतील अत्यंत वर्दळीच्या रविवार पेठेतील उघड्या मारुती मंदिर समोर असणाऱ्या सुहास रेडिमेड व मॅचिंग सेंटर या दुकानात फिर्यादी विपुल अरिंजय दोशी यांचे वडील अरिंजय दोशी हे त्यांच्या दुकानात गिन्हाईकाला अस्तर देत असताना आदित्य अहिवळे (रा. मंगळवार पेठ फलटण) हातात कोयता घेऊन व त्याचा अनोळखी मित्र हातात तलवार घेवुन येवुन अरिंजय यांच्या अंगावर कोयता उगारत डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तो चुकवला. यानंतर कोयत्याचा धाक दाखवुन दुकानाचे काऊंन्टरमधुन अंदाजे 25 हजार रुपये जबरदस्तीने काढुन घेवुन गेले. तसेच वैभव रमनलाल दोशी यांचे फुलचंद दलुचंद दोशी किराणा मालाचे दुकानात जावुन वैभव दोशी यांना तलवारीचा व कोयत्याचा धाक दाखवून आम्हाला महिन्याला 3 हजार रूपये हफ्ता दिला पाहिजे, तरच तुम्ही धंदा करू शकाल व तुम्ही जर हि रक्कम आम्हास दिली नाही तर याच कोयत्याने तुम्हाला जिवे मारू अशी दमदाटी केली तसेच तौमिफ निजामुद्दीन शेख यांच्या दुकानातील बॅट हिसकावून घेऊन दुकानातून बाहेर जाऊन दुकानावर दगडफेक केली.
रविवार बाजाराचा दिवस असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होती भर बाजार पेठेत हल्लेखोरांनी अनेक दुकांनामध्ये धाक दाखवून दोघांनी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यापाऱ्यांध्ये काही काळ दहशत निर्माण झाली होती. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली असून सुदर्शन घटने फलटणमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.