फलटण प्रतिनीधी:- अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्या प्रकरणी खुंटे येथील एक जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे पाच महिण्यापुर्वी खुंटे ता फलटण येथील रीटे वस्तीवर अल्पवयीन मुलीच्या मालकीच्या जनावरांचा गोठ्यावर सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी एकटीच असताना तिच्या शेजारील गौरव ऊर्फ सचिन नितीन खलाटे (रा. खुंटे ता फलटण) हा सुझुकी कंपणीची टि.व्ही.एस स्टार मोटर सायकल घेवुन येवुन अल्पवयीन मुलीस वाईट हेतुने अंगाला मिठी मारली व तो वेगवेगळे अश्लील चाळे करुन त्याने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. तसेच मुलगी बारामती येथे शिक्षण घेत असताना सदर ठिकाणी गौरव ऊर्फ सचिन नितीन खलाटे हा त्यांचेकडे असणारी पांढरे रंगाची ओमणी गाडी वरचेवर घेवुन येवुन मुलीस ब्लॅकमेल करुन त्यांचे ओमणी गाडीत बळजबरीने बसवुन निर्जन स्थळी नेहुन दोन ते तीन वेळा बळजबरीने बलात्कार केला.
तसेच सदरचा प्रकार घरातील लोकांना सांगीतला तर तुझ्या वडीलांना जिवे मारुन टाकीणं अशी दमदाटी केली. सुमारे एक महिण्यापुर्वी मुलीने संशयीत आरोपीचा मोबाईल ब्लॉक केला म्हणुन बारामती येथे कॉलेजवर येवुन मुलीचा मोबाईल हिसकावुन घेवुन तो जमीनीवर आपटुन त्यांचे नुकसान केले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गौरव ऊर्फ सचिन नितीन खलाटे याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास स.पो.नी शिंदे करत असून या गुन्ह्यातील संशयीत आरोपी गौरव ऊर्फ सचिन नितीन खलाटे यास अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.