फलटण : फलटण येथे आज १ ऑगस्ट २०२२ रोजी शिवशाहीर लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुढील कार्यक्रम अण्णाभाऊ साठे समाज मंदीर येथे संपन्न झाला.यावेळी जयंती निमित्ताने जिलेबी वाटप कार्यक्रम संपन्न झाला.त्या नंतर निंभोरे येथील कैभाऊसाहेब देठणकर प्राथमिक आश्रमशाळा येथे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन महिला आघाडी फलटण शहर अध्यक्ष सपना भोसले, फलटण शहर अध्यक्ष उमेश कांबळे यांनी केले होते. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे सातारा जिल्हा पूर्व विभागाचे अध्यक्ष भिमराव घोरपडे, अरविंद आढाव, संदीप काकडे, मयुरी गायकवाड, किरण अहिवळे, ओमकार अहिवळे, सुजल भोसले, वंदना गायकवाड,अर्चना झेंडे, ताई खुडे या कार्यक्रमाला उपस्थित होते.