फलटण नगर परिषद आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक १ ते १३ च्या प्रभाग निहाय मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका असून , त्या चुका सुधारून ,नवीन मतदार याद्या प्रसिद्ध करावी अशी मागणी भाजपाकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
फलटण नगर परिषद आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक १ ते १३ च्या प्रभाग निहाय मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका असून , त्या चुका सुधारून , नवीन मतदार याद्या प्रसिद्ध करावी अशी मागणी भाजपाकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांचेकडे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव आणि भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यादी दुरुस्त करण्याबाबत निवेदन दिले आहे. फलटण नगर पालिकेने प्रसिद्ध केलेल्या सदर याद्या तपासता नकाशाप्रमाणे चुकीच्या पद्धतीने केल्याचे दिसून येत आहे, काही ठिकाणी हद्दीबाहेरील नावांचा समावेश असल्याचे नमूद करीत प्रत्येक प्रभागात २०० ते ३०० नावे प्रभाग निहाय व स्थळ दर्शविल्याप्रमाणे नसल्याचे निदर्शनास आणून देत त्यामध्ये योग्य त्या दुरुस्त्या करण्याची मागणी करण्यात आली आहे . प्रभाग क्रमांक १ ते १३ मधील जाहीर केलेल्या नकाशानुसार सदर याद्या B. L. O. यांच्याशी विचार विनिमय न घेता मागील पद्धतीने केल्या असल्याने त्या याद्यांमध्ये प्रचंड चुका झाल्या आहेत, तरी जाहीर झालेल्या प्रभाग नकाशा प्रमाणे ज्या त्या प्रभागातील नावे ज्या त्या प्रभागात समाविष्ट करून नवीन योग्य मतदार याद्या तयार करुन फेर प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.