फलटण प्रतिनिधी :- चायनीज मांज्यामुळे एक जणांच्या नाकाला, कानाला व बोटाला मांज्या कापून जखमी झाल्याची घटना फलटण येथे घडली असून चायनीज मांज्या शहरात खुल्लम खुल्या पद्धतीने विक्री होत असल्याने पोलिस जाणीवपूर्वक चायनीज मांज्या विक्रीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून फलटण शहरासह तालुक्यात अत्यंत धोकादायक असा चायनीज मांजा खुल्लमखुल्ला विक्री होत असल्याने या विक्री विरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत होती परंतु याबाबत पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे शहरात सर्वच ठिकाणी चायनीज मांज्याची सहजपणे विक्री केला जात होती. माणसांसाठी तसेच पक्षांसाठी अत्यंत धोकादायक असलेला या चायनीज मांज्यामुळे यापूर्वी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
आज फलटण येथे सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास संतोष जगन्नाथ कोलवडकर (रा. दालवडी,ता. फलटण, जि. सातारा) हे सोमवार पेठ येथील बाह्य रस्त्यावरून कामानिमित्त दुचाकीवरुन जात असताना अचानक रस्त्यावर लोंबत असलेला चायनीज मांज्या त्यांच्या नाकाला व कानाला कापला यावेळी हात पुढे केला असता हाताच्या बोटाला ही चायनीज मांजा कापला यावेळी त्यांनी लगेच दुचाकीचा ब्रेक लावला व थांबले. चायनीज मांज्यामुळे संतोष जगन्नाथ कोलवडकर यांच्या नाकाला, कानाला व बोटाला गंभीर जखम झाली व रक्त येण्यास सुरुवात झाली. यावेळी काही लोकांनी त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आले. त्यानंतर त्यांच्यावर येथे लगेचच उपचार करण्यात आले. संतोष जगन्नाथ कोलवडकर यांच्या नाकाचा पुढील भाग कापून तुटला असून कान ही कापला गेला आहे तसेच बोटही खोलवर तुटले आहे.या घटनेत संतोष जगन्नाथ कोलवडकर हे थोडक्यात बचावले असून गाडीचा वेग जास्त असता अथवा दुर्लक्ष झाले असते तर गळ्याला गंभीर इजा होऊन जीव धोक्यात गेला असता.
पोलिस यंत्रणा चायनीज मांज्या विक्रेत्याकडे कोणत्या कारणांमुळे दुर्लक्ष करत आहे हा प्रश्न नागरिक उपस्थित करत असून शहरात सर्रास रस्त्यावर चायनीज मांजा दिसून येत असून येणाऱ्या काळात या चायनीज माझ्यामुळे एखाद्याचा जीव धोक्यात आल्यास कोणावर कारवाई करावी ? कोणाला जबाबदार धरावे पोलिसाना की चायनीज मांज्या विक्री करणाऱ्या विक्रेते यांना ? हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.