फलटण प्रतिनिधी :- पतीस मारहाण करताना पत्नी सोडवण्यास गेली असता तीन जणांनी मारहाण करत विनयभंग केल्या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 16 सायंकाळी 6.30 वाजता फिर्यादी महिला यांच्या पवार गल्ली रविवार पेठ फलटण येथील घरासमोर फिर्यादी महिला यांच्या पतीला विजय संभाजी गाडे व त्याचे दोन अनोळखी मित्र यांनी हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत होते म्हणून फिर्यादी महिला भांडणे सोडवण्यासाठी गेली असता विजय गाडे यांनी वाईट हेतूने फिर्यादी महिला यांच्या उजव्या हातास धरून ड्रेसच्या उजवी बाजूची भाई ओढून फाडली तसेच दोन अनोळखी व्यक्ती पैकी एकाने फिर्यादी महिलेची ओढणी काढुन टाकली त्या दोघांनी फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत केले व त्यातील दुसऱ्यांनी फिर्यादी महिलेच्या डाव्या डोळ्यावर हाताने बुक्की मारली व त्यानंतर शिवीगाळ करून तिथून जाताना तू आणि तुझा नवरा दिवसभर कामावर असता त्यावेळी तुझ्या मुलांना बघून घेईन अशी धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.हा भिसे तपास करत आहेत.