सोनगाव (फलटण ) येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून विरबॅक ऍनिमल इंडिया प्रा. ली. या कंपनीने वॉटर फिल्टर बसवला होता त्याचा लोकार्पण सोहळा विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनी संपन्न झाला. यावेळी विरबॅक ॲनिमल इंडिया प्रा. लि. चे मॅनेजर व सोनगाव चे उपसरपंच हनुमंत गोरे, डॉ सत्यवान साबळे, सोनगाव सोसायटी चे चेअरमन विकास पाटील, सोनगाव ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य अजित कांबळे, प्रगतशील बागायदर माऊली थोरात इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.