माढा लोकसभा मतदारसंघातील रस्त्यासाठी निधी मिळावा - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मागणी
दिल्ली येथे केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक दिल्ली येथे संपन्न झाली. यावेळी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी ना. गडकरी यांना निवेदन देऊन माढा मतदार संघातील विविध रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली. ना. नितीन गडकरी यांना सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये जी मागणी केली होती तीच मागणी पूर्ण करावी अशी विनंती केली. त्यानुसार ना.गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील अशा सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या. खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढील रस्त्याची मागणी केली आहे १) पुणे -फलटण - खटाव -माण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग पूर्ण केल्यानंतर या भागाचा आर्थिक विकास होणार आहे. तसेच या महामार्गावर नाईकबोमवाडी येथे औद्योगिक वसाहत पूर्ण झाल्यास फलटण ते इंडस्ट्रियल कॉरिडॉर विकसित होईल २) करमाळा ते टेंभुर्णी रस्ता लवकरच चौपदरीकरण करावा तसेच हा रस्ता टेंभुर्णी गावासह चौकापर्यंत गटारी सह पूर्ण करण्यात यावा ३) करमाळा सोलापूर येथे ओवर ब्रिज मंजूर करण्यात यावा ४) नवीन पुणे सोलापूर सहा पदरी हायवे मंजूर करण्यात यावा ५) माण तालुक्यातील माणगंगा नदीवर अतिरिक्त ओवर ब्रिज मंजूर होणे, ६) फलटण उपळवे एम डी आर ६७ यासाठी तीस कोटी निधी उपलब्ध व्हावा ७) संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गावर मोठी गावे असलेल्या गावात स्वागत कमानी उभारून त्यावर ऐतिहासिक परंपरांचा उल्लेख करावा ८) सोलापूर औद्योगिक शहर असल्याने शहरात सर्वाधिक औषध उत्पादन होते त्यामुळे औद्योगिक कॉरिडोर म्हणून घोषित करावे ९) टेंभुर्णी ते अकलूज काँक्रिटीकरण लवकरात लवकर करावे १०) महाराष्ट्रातील भक्तांचे प्रसिद्ध देवस्थान तुळजापूर व शंकराचे श्रद्धास्थान शिंगणापूर यांना जोडणारा रस्ता बार्शी तुळजापूर कुरडेवाडी टेंभुर्णी मार्गे शिंगणापूर निधी उपलब्ध होऊन हा प्रश्न लवकर सुटावा ११) शेरचीवाडी सालपे सुरवडी येथे ओव्हर ब्रिज मंजूर करणे बाबत १२) फलटण येथे विमानतळ असून विमानतळाची धावपट्टी लहान असल्याकारणाने विमान उतरवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे हवाई पट्टीची तरतूद करणेबाबत अशा अनेक निधीसाठी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागणी केली आहे.