फलटण प्रतिनिधी -
जिंती ता. फलटण येथे राहते घराचा बंद दरवाजा अज्ञात इसमाने कोयंडा तोडून घरात प्रवेश करून बेड मधील फर्निचरचे कपाट उचकटून आतील साहित्य अस्ताव्यस्त करून त्यामधील सोन्याचे सुमारे 42 तोळे 08 ग्रॅम वजनाचे 17लाख 12 हजार रुपये रकमेचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे.
सा संदर्भात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात आदित्य अशोक रणवरे राहणार जिंती (कॉर्पोरेशन बंगला ) तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अरगडे करीत आहेत.