लोणंद ता. खंडाळा येथील विकास प्रमोद ननावरे व अमित रामचंद्र मोरे यांनी सावकारी व जमीन लुबाडण्या प्रकरणी लोणंद पोलीस स्टेशन येथे वारंवार गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करून देखील जाणीवपूर्वक उशिरा गुन्हा दाखल करत व योग्य ती कलमे गुन्ह्यामध्ये न लावल्या प्रकरणी महेंद्र लक्ष्मण अहिवळे, सासवड ता. फलटण यांनी दिनांक 23 नोव्हेंबर 2022 पासून फलटण येथील प्रांत कार्यासमोर उपोषण करण्याचे एका निवेदनाद्वारे कळविले आहे. या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की सावकारी आणि अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यास ४ महिने टाळाटाळ केली आहे.तर मा पोलीस अधीक्षक साहेब सातारा यांच्याकडे तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्या मध्ये अनुसूचित जातीच्या लोकांची जमीन हडप केल्याचा गुन्हा असून ही अट्रोसिटी कलम टाकण्यास नका दिला आहे.
गुन्हा दाखल करायला दिनांक २९/०९/२०२२ ला गेल्यावर ७ तास थांबवून ठेवण्यात आले होते (सी सी टिव्ही रेकॉर्ड काढून पहावे) व ५ /१०/२०२२ ला जबाबला बोलवण्याबद्दल बद्दल चे पत्र दि. ८/१०/२०२२ या तारखेला देण्याचा पवार मॅडम यांनी प्रताप केल्याचे निवेदनात म्हटले आहे. गुन्ह्यासंबंधी माहिती घेण्यास पोलीस स्टेशनला गेले असता अपमानास्पद वागणूक दिली गेली यामुळे हे उपोषण करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये लोणंद पोलीस स्टेशन चे पोलीस उप निरीक्षक वायकर साहेब यांचेवर गुन्हा दाखल करण्यास केलेली टाळाटाळ बद्दल चौकशी करावी, अट्रोसिटी दाखल करण्यास कसूर करणारे अधिकारी श्री वायकर यांच्यावर देखील अट्रोसिटी अंतरंगात कारवाई करण्यात यावी, लोणंद पोलीस स्टेशन च्या अधिकारी पवार मॅडम यांच्यावर समन्स पाठवताना केलेला भ्रष्टाचार बद्दल कारवाई करावी गु र क्रमांक ३११/२०२२ मध्ये अट्रोसिटी व फसवणूक चे कलम वाढवणे आदी मागण्या महेंद्र अहिवळे यांनी केल्या आहेत.