कामथी, ता. सातारा येथील ग्रामपंचायत शिपाईला संशयिताने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. हे पैसे न दिल्याचा राग मनात धरून त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
सातारा : कामथी, ता. सातारा येथील ग्रामपंचायत शिपाईला संशयिताने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. हे पैसे न दिल्याचा राग मनात धरून त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, रविवारी ५.३० वाजण्याच्या सुमारास कामथी गावातील चांदणी चौकात ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत असलेले धनाजी प्रकाश चव्हाण वय ३१ यांच्याकडे संशयित केतन किसन चव्हाण, रा. कामथी याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. हे पैसे देण्यास धनाजी चव्हाण यांनी नकार दिला. यामुळे दोघांच्यात वादावादी सुरू झाली. पैसे न दिल्याचा राग मनात धरून केतन चव्हाण याने धनाजी चव्हाण यांच्यावर कुऱहाडाने वार करायला सूरूवात केली. डोक्यात व पायावर वार करून तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आणि गंभीर जखमी केले. या मारहाणीत जखमी झालेल्या धनाजी यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. केतन यांच्याविरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप त्याला अटक झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांनी घटनास्थळी भेट दिली.