मा.कांतीलाल उमाप सो आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, सुनील चव्हाण संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.डॉ.एच.बी.तडवी सो विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क,कोल्हापूर विभाग कोल्हापूर व मा.वैभव वैद्य अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा विभागाने दिनांक 26/06/2022 रोजी मौजे- खोडद ता.जि.सातारा गावचे हददीत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गवर हॉटेल राजपुरोहीत समोर गोव्यावरुन राजस्थानला जाणारी बेकायदा गोवा बनावट विदेशी दारुची वाहतूक पकडून आरोपी क्र.1) मुकेश मोहनलाल सिसोदिया वय 39 वर्षे रा.खजुरीया ता.हातोड जि.इंदोर मध्यप्रदेश 453111 व आरोपी क्र.2) जितेंद्र भरतसिंग राठोड वय 36 वर्षे रा. मेथवाडा ता.डेपालपूर जि.इंदोर मध्यप्रदेश-453001 यांना अटक करुन त्यांचे विरुदध 1) महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65(a)(e),81,83,90,103 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर कारवाई वेळी 180 मि.ली. क्षमतेच्या विदेशी दारुच्या एकूण 36,000 बाटल्या (750 बॉक्स), एक सहाचाकी आयशर ट्रक क्रमांक MH 14 FT 9614, दोन मोबाईल, दारुचे बॉक्स लपवण्यासाठी वापरलेल्या काजूच्या टरपलांच्या 47
गोणीसह एकूण 53,29,275/- (53 लाख 29 हजार दोनशे पंच्याहत्तर ) रुपये किंमतीचा मुददे्माल जप्त करण्यात आला.
आरोपीत दोन्ही इसमांस मा.न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे.
सदर कारवाईमध्ये प्रभारी निरीक्षक एन.पी.क्षीरसागर, निरीक्षक , संजय साळवी, दुय्यम निरीक्षक ,किरण बिरादार, रोहीत माने, शरद नरळे, सहा.दु.निरीक्षक महेश मोहिते, नितीन जाधव, जवान सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जिवन शिर्के, किरण जंगम, भिमराव माळी, विनोद बनसोडे, राणी काळोखे यांनी भाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास श्री.एन.पी.क्षीरसागर प्रभारी निरीक्षक हे करीत आहेत. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांचेकडून आवाहन करण्यात येते की, सातारा जिल्हयामध्ये बेकायदा गोवा बनावट, बनावट दारुची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती या कार्यालयास तात्काळ देण्यात यावी असे आवाहन वैभव वैद्य अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी केले आहे.