माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने आज शुक्रवार दिनांक 7 एप्रिल रोजी विविध मान्यवरांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीची पाहणी केली असून वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीच्या निधीचा योग्य वापर होईल असे यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक व गटनेते अशोकराव जाधव यांनी धैर्य टाईम्सशी बोलताना सांगितले.
वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रधान्याने सोडवीला आहे. वैशिष्ठ्य पूर्ण योजनेतून मिळालेल्या निधीच्या कामाचे स्वरूप ठरविण्यासाठी आज सस्तेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या दफनभूमी येथे पाहणी करण्यात आली.
यावेळी अशोकराव जाधव यांच्यासह मा. प्राचार्य रवींद्र येवले, ,सेंट्रल रेल्वे पुणे डिव्हिजन सल्लागार समिती सदस्य तानाजी करळे, प्रा.सतीश जंगम, तसेच वीरशैव लिंगायत समाजातील ज्येष्ठ नागरिक व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.