फलटण प्रतिनिधी :- दिनांक 13 नोव्हेंबर रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सर्व स्टाफ सह श्री दत्त इंडिया कारखाना साखरवाडी तळावर व स्वराज कारखाना उपाळवे वाहन तळावर जाऊन त्या ठिकाणी उभ्या असलेल्या सर्व ट्रॅक्टर चालकांचे प्रत्येक ट्रॅक्टरला रिफ्लेक्ट लावण्याबाबत समुपदेशन करण्यात आले व सूचना दिल्या.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगीतले की,कोणताही ट्रॅक्टर भरलेला किंवा खाली हा विना रिफ्लेक्टर मिळून आल्यास वाहतूक कायद्याप्रमाणे कारवाई होणार असून कोणत्याही ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावलेला नसेल आणि अपघात झाल्यास सदोष मनुष्यवताचा गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच सर्व ट्रॅक्टर चालकांनी करण कर्कश्य टेप रेकॉर्ड काढून घ्यावेत अन्यथा त्यांच्यावर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
कोणताही ट्रॅक्टर चालक हा दारू पिऊन वाहन चालवणार नाही तसेच प्रत्येक कारखान्याच्या रस्त्यावर वाहतूक पोलीसांची नेमणूक करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल.
यावेळी पोलीसांनी व श्री दत्त कारखान्याचे एमडी जगताप साहेब व स्वराज कारखान्याचे डफळ साहेब यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी ऊस भरलेल्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावून अनौपचारिक उद्घाटन केले. तसेच प्रत्येक ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस रिफ्लेक्टर पट्टी लावावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
फलटण मधील तमाम नागरिकांना हि यावेळी विनंती करण्यात आले आहे की जोपर्यंत ऊस वाहतूक सुरू आहे तोपर्यंत दुचाकी चालकांनी डोक्यामध्ये हेल्मेट घालावे. हेल्मेटला ओझे समजू नका यमदुतापासून ते आपली सुटका करणारे ब्रह्मास्त्र आहे.उद्यापासून याबाबत सक्त कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी यावेळी दिली.