फलटण प्रतिनिधी :
फलटण पंचायत समितीचे माजी सभापती व धनगर नेते रामभाऊ ढेकळे व वाठार - निंबाळकर येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार नाळे यांचा राजे गटाला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सातारा येथे प्रवेश केला. यावेळी खासदार नितीनकाका पाटील, आमदार सचिन पाटील व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
धनगर नेते रामभाऊ ढेकळे व वाठार - निंबाळकर येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार नाळे यांचा फलटणच्या राजकारणात नेहमीच लक्षवेदी कामगिरी राहिली आहे. फलटणच्या पश्चिम भागात मोठा जनसंपर्क यादोन्हीही मातब्बर नेत्यांचा राहिला आहे. शिवरूपराजे खर्डेकर यांनी फलटण तालुक्यातील विविध नेत्यांशी जनसंपर्क वाढवीला आहे.