नेत्यांचे ठरलं…!
फलटण पंचायत समितीत राजकीय घडामोडींना वेग
फलटण : फलटण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू असून सत्तेची समीकरणे जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समितीच्या सभापती पदासाठी शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी अर्ज दाखल केला असून उपसभापती पदासाठी अमोल दशरथ सस्ते यांनी अर्ज दाखल केला आहे. या निवडीसंदर्भात भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय समन्वय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यानुसार सभापती पद भाजपकडे तर उपसभापती पद शिवसेनेकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या निवडीसंदर्भात पंचायत समिती सदस्यांमध्ये बैठका आणि चर्चांना वेग आला असून अंतिम अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील राजकारणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(अधिक वृत्त लवकरच…)










