ब-याच वीज ग्राहकांचे मीटर घरात आडोशाला बसविण्यात आले होते. अशा ठिकाणी होत असलेली वीजचोरी लवकर लक्षात येत नव्हती म्हणून महावितरणने असे सर्व मीटर त्या जागांवरून हलवून घराच्या समोरच्या बाजूस ते सहजपणे दिसतील अशा ठिकाणी बसविले होते मात्र आता हेच विजमीटर सध्या विजेच्या खांबावर बसविण्याचे काम फलटण शहरातील काहीच भागात सुरु आहे.
फलटण येथील मंगळवार पेठ येथील काही वीज ग्राहकांचे विज मिटर बाहेर विजेच्या खांबावर बसविले आहेत. मात्र यात मोठा सावळा गोंधळ उडाला असून एकाचा मीटर व दुसऱ्याचे वीज कनेक्शन अशी अवस्था अनेक ठिकाणी झाल्याने वीज ग्राहक संतप्त झाले आहेत. त्यामुळे आता वीज मिटर हलवू नका म्हणून फलटण येथे विरोध होऊ लागल्याने वीज कर्मचारी व वीज ग्राहक यांच्यात वाद होऊ लागले आहेत त्यामुळे आता वीज ग्राहक व कर्मचारी याच्या मध्ये तणावाचे वातावरण होऊ लागले असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
कार्यकारी अभियंता कामात व्यस्त : मोबाईल वर आलेला फोन घेण्यासाठी वेळ नाही
फलटण येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांना या विषयी माहिती घेण्यासाठी मोबाईल वर फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांची या विषयी प्रतिक्रिया मिळू शकली नाही.