फलटण प्रतिनीधी:-मौजे दुधेबावी गावचे हद्दीत मोगराळे घाटाचे पायथ्याशी ट्रक टँकर वेगात चालवल्याने झालेल्या अपघातात गोठ्यातील तीन जर्सी गाईचा मृत्यू झाला असून याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे दुधेबावी गावचे हद्दीत मोगराळे घाटाचे पायथ्याशी दिनांक १८ रोजी रात्री २.०५ वाजण्याच्या सुमारास फलटण ते दहिवडी जाणारे रोडवर मोगराळे घाटाचे पायथ्याशी माझी घराजवळ माल ट्रक टँकर वरील चालक दीपक दिलीप शिंदे (रा.बलवडी ता.सांगोला जि.सोलापूर) याने त्याच्याकडील माल ट्रक टँकर नंबर एम एच.०९.सी यू.८४५५ हा वेगाने चालवल्याने उतरावर टँकरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला त्यामध्ये फिर्यादी यांच्या गोठ्यातील तीन जर्सी गाई मयत झाल्या असून टँकर चालकास किरकोळ दुखापत झाली असून माल ट्रक टँकर व त्यामधील द्रवरूप मळीच्या नुकसानीस कारणीभूत झाल्या प्रकरणी फिर्यादी सुरेश ज्ञानदेव मदने (रा. भिसे वस्ती,दुधेबावी ता.फलटण जिल्हा सातारा) यांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.ना कदम करत आहेत.