Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

पोल्ट्रीच्या नावाखाली कत्तलखाना : दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

फलटण तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघड
टीम : धैर्य टाईम्स

मौजे मिरगाव (ता. फलटण ) येथे एका कत्तलखाण्यात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकुण 42 जिवंत जर्शी गायीची वासरे व कत्तल केलेल्या 30 जर्शी गायीची वासरांचे मांस, पायाचे खोर, डोके, काढुन टाकलेली कातडी आढळून आली असून यावेळी एकुण 6 लाख 16 हजार रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करत दोन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण ग्रामीण पोलिसांना मिरगाव ता. फलटण येथे गायीची वासरे कत्तल करणेसाठी आणलेली आहेत अशी माहिती मिळाली असता मौजे मिरगाव ता. फलटण गावचे हद्दीतील वेताळबाबा मंदीरा शेजारी असणारे पोल्ट्री येथे पोलिसांनी धाड टाकली असता पोल्ट्रीमध्ये असणारे लोकांना पोलिसांची चाहुल लागताचा ते अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. पोल्ट्रीमध्ये पोलीसांनी पाहीले असता अंदाजे 2 दिवस ते 40 दिवस या वयोगटातील एकुण 42 काळ्या, पांढऱ्या, तांबड्या रंगाची जर्शी गायीची वासरे कत्तल करण्यासाठीं आणलेली पोलिसांना आढळून आली आली तसेच अंदाजे 30 जर्शी गायीची वासरे कत्तल केलेल्या वासरांचे मांस, पायाचे खोर, डोके, काढुन टाकलेली कातडी तसेच पोल्ट्रीमध्ये सर्वत्र रक्त, पाणी पडलेले दिसत होते.

तसेच जणावरे कापण्यासाठी हत्यारे दिसत होती व पोल्ट्रीच्या बाहेर पाहीले असता एक पांढऱ्या रंगाचा पिक अप क्र-MH 04 AL 8155 हि गाडी उभी होती. गाडीची पहाणी केली असता आतमध्ये वासरांची कत्तल केलेले मांस व मुंडकी दिसुन आली. हि गाडी ताब्यात घेतली व मा.पशु वैद्यकीय अधीकारी डॉ फाळके यांचे कडुन मांसाची व कत्तल केलेल्या वासरांची तपासणी करुन घेतली. सदर पोल्ट्री ही कोणाच्या मालकी आहे याबाबत विचारपुस केली असता सदर पोल्ट्री ही सोपान शंकर सुळ (रा. मिरगाव ता. फलटण) यांचे मालकीची असल्याचे पोलिसांना समजले. 

पोल्ट्री मालक सोपान सुळ यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता पोल्ट्री ही शब्बीर शेख (पुर्ण नाव माहीत नाही) (रा. फलटण ता. फलटण) यांना भाडेतत्वावर वापरणेसाठी दिलेली आहे असे सांगीतले. सदर ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 4 लाख रुपये किंमतीची एक पांढऱ्या रंगाचा पिक अप (क्र-MH 04 AL 8155) तसेच 1 लाख 26 हजार रुपये किंमतीची अंदाजे 2 दिवस ते 40 दिवस या वयोगटतील एकुण 42 काळ्या, पाढऱ्या, तांबड्या रंगाची जर्शी गायीची वासरे, 90 हजार रुपये किंमतीची अंदाजे 30 जर्शी गायीची वासरे कत्तलकेलेल्या वासरांचे मांस, पायाचे खोर, डोके, काढुन टाकलेली कातडी असा एकुण 6 लाख 16 हजार रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शब्बीर शेख (पुर्ण नाव माहीत नाही) व सोपान शंकर सुळ यांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER