सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्हामध्ये मुले पळवून नेणारी टोळी असल्याच्या अफवामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत आहे. फलटण तालुक्यामध्ये कुठेही मुले पळवणारी टोळी वगैरे आलेली नाही त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केले आहे.
अशा प्रकारे संशयित व्यक्ती निदर्शनास आल्यास संबंधित गावचे पोलीस पाटील किंवा फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस फोन नं.०२१६६-२२२५३३ या फोनवर किंवा पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.धन्यकुमार गोडसे मो.न.९४२३०१२३४५ स.पो.नि भोसले मो.नं. 7738147796, पो.उ.नि. अरगडे मो.नं. 917038250707, पो.उ.नि.धोंगडे मॅडम मो.नं. 918975268220 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पो.नि.गोडसे यांनी केले आहे
अशा प्रकारचा संशयित व्यक्ती आढळल्यास कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा व्यक्तींना मारहाण करू नये. मारहाण केल्यास संबंधीतावर गुन्हा दाखल करून मारहाण करणार्यावर कडक कारवाई करणार असल्याचे गोडसे यांनी कळविले आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे अफवा पसरवणारावरही कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक गोडसे यांनी सांगितले आहे.
या अनुषंगाने विविध व्हाट्सअप ग्रुपवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. जर कोणी व्हाटसअपवर खोटी माहिती फॉरवर्ड केली तर ग्रुप अँडमिन व माहिती पाठवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक गोडसे यांनी यावेळी दिला आहे.