Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा-फलटण राजघराण्यांमध्ये साखरपेरणी

खा. श्री.छ. उदयनराजेंच्या फलटण भेटीने सर्वपक्षीय पुढारी, कार्यकर्ते हर्षोल्हासित
टीम : धैर्य टाईम्स
Sugarcane sowing in Satara-Phaltan dynasties in connection with District Bank elections
राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले कधी काय करतील, याचा नेम नसतो. त्याचाच प्रत्यय आज फलटणकरांना आला. सातारच्या राजकारणात एकमेकांचे जानी दुश्मन म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी जात खा. उदयनराजेंनी जिल्हावासीयांना पुन्हा एकदा जोर का झटका धीरे से दिया.

सातारा : राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले कधी काय करतील, याचा नेम नसतो. त्याचाच प्रत्यय आज फलटणकरांना आला. सातारच्या राजकारणात एकमेकांचे जानी दुश्मन म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी जात खा. उदयनराजेंनी जिल्हावासीयांना पुन्हा एकदा जोर का झटका धीरे से दिया.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील वातावरण तावून सुलाखून निघाले आहे. पक्षीय मतभेद बाजूला ठेवत राष्ट्रवादी, सेना, भाजपा, कॉंग्रेस या पक्षांमधील मातब्बरांनी एकत्र येवून आपापली जागा वाचविण्यासाठी फिल्डिंग लावलेली आहे. असे असताना खा. उदयनराजे, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांनी उमेदवारी अर्ज भरुन जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रंगत आणलेली आहे. खा. उदयनराजे यांनी गृहनिर्माण मधून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्याचबरोबर फलटणमधील दिलीपसिंह भोसले, डी.के. पवार यांच्यासह सातारच्या पालकमंत्र्यांचे बंधू जयवंतराव पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने राष्ट्रवादी खा. उदयनराजे विरोधातील कुस्ती हेवीवेट करणार, हे निश्‍चित झालेले आहे. याच पार्श्‍वभूमीवर आज दि. 8 रोजी खा. उदयनराजे यांनी भल्या सकाळी फलटण शहरात आपल्या कार्यकर्त्यांसह धडक दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
गेल्या काही वर्षांमध्ये खा. उदयनराजे व सभापती रामराजे यांच्यामध्ये टोकाचे राजकीय मतभेद निर्माण झाले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे सातारा व फलटण या दोन्ही राजगाद्यांमधील नात्यांमध्येही कटूता निर्माण झाली होती. परंतू दोन आठवड्यांपूर्वी खा. उदयनराजे भोसले यांनी सभापती रामराजे यांची सातारा येथील विश्रामगृहात भेट घेवून सगळ्यांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर आज खा. उदयनराजेंनी थेट फलटण गाठत रामराजे यांच्या निवासस्थानी भेट दिली. ही वरवरुन जरी साधी भेट वाटत असली तरी जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगानेच खा. उदयनराजे यांनी रामराजेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
उदयनराजेंनी रामराजेंची भेट घेतल्यानंतर रामराजेंचे बंधू जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, भगिनी तथा फलटण पालिकेच्या विद्यमान नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर यांची भेट घेतली. त्यानंतर अनुक्रमे दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे ज्येष्ठ सुपूत्र- फलटण पालिकेचे विरोधी पक्षनेते समशेर नाईक-निंबाळकर, श्रीमती शारदादेवी चिमणराव कदम, युवा नेते दिगंबर आगवणे, प्रल्हाद साळुंखे-पाटील, दिलीपसिंह भोसले, रविंद्र भोईटे, बबनराव निकम, बुवासाहेब गुंजवटे, कौशल्या पवार, किसनराव भोसले यांच्यासह जगदीश उर्फ बाळासाहेब कदम यांच्या आज भेटी घेतल्या. दरम्यान, उदयनराजेंच्या अनपेक्षित फलटण दौर्‍यामुळे फलटणमधील अनेकांना सुखद धक्का बसला. फलटण-सातारा राजघराण्यांमध्ये ताणलेले राजकीय संबंधही यानिमित्ताने सैल झाले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER