फलटण (प्रतिनिधी ) २ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती पर्यत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा गजानन चौक या ठिकाणी न बसवल्यास फलटण नगरपालिका, मुख्याधिकारी व संबधित अधिकारी यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहीती फलटण तालुका काँग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष अमीरभाई शेख यांनी दिली. फलटण तालुका कॉंग्रेस च्या वतीने १५ ऑगस्ट 2022 रोजी गजानन चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या पुतळा बसविण्यासाठी फलटण नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या दालना समोर आमरण उपोषण करण्यात येणार होते परंतु फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी फलटण तहसीलदार याच्या दालनात मिटींग आयोजित केली व त्या मध्ये फलटण तालुका काँग्रेस कमिटी च्या पदाधिकारी यांना लेखी पत्र दिले की १५ दिवसात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा गजानन चौकात बसवला जाईल. परंतु आता १ महिना झाला तरी राष्ट्पिता महात्मा गांधी याच्या पुतळा गजानन चौकात बसवला नाही. २ ऑक्टोबर ला राष्ट्रपिता महात्मा गांधी याची जंयती असल्या मुळे जंयती निमित्त फलटण तालुका काँग्रेस कमिटी चे अमीरभाई शेख यांनी इशारा दिला असून २ ऑक्टोबर पर्यत महात्मा गांधी यांचा पुतळा गजानन चौकात न बसवल्यास फलटण नगरपालिका , मुख्याधिकारी व संबधित आधिकारी याच्या विरोधात कोर्टात दाद मागणार आहे.