फलटण प्रतिनिधी :
पोलीस असल्याचे सांगून फसवणूक करून महिलेचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना फलटण शहरात घडली असुन याबाबत दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ रोजी सायंकाळी ६ वाजताचे दरम्यान अवधूत अपार्टमेंट लक्ष्मीनगर फलटण ते महादेव मळा कोळकी जाणारे रोडवर फिर्यादी सौ वंदना मोहन झेंडे (रा. अवधूत अपार्टमेंट लक्ष्मी नगर फलटण) या पायी चालत असताना दोन अनोळखी व्यक्ती यांनी मोटार सायकल वरून येऊन पोलीस असल्याचे सांगून फसवणूक करून फिर्यादी
वंदना झेंडे यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे सुमारे १४ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण फसवून चोरून नेले. याप्रकरणी सौ वंदना मोहन झेंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पो. ना. लावंड करत आहेत.