फलटण प्रतिनीधी:- शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार पेठ कुरेशीनगर येथील अवैध बेकायदेशीर कत्तलखाना दोन जेसीबी च्या सहाय्याने उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या नेतृत्वाखाली जमीनदोस्त करण्यात आला.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.८ मार्च रोजी पहाटे कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल झालेची घटना पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवंश जातीची जिवंत जनावरे, मृत जनावरांची शिगे असा सुमारे २ लाख ५ हजार १०० रूपये किमतींचा चा मुद्देमाल जप्त करून फलटण शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जनावरांची अवैध वाहतूक,कत्तल तसेच त्यांच्यावर होणा-या अत्याचाराच्या बाबत फलटण शहर पोलिस ठाणे हद्दीत सन २०२३ पासुन आज पर्यंत एकूण ३० गुन्हे फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. अवैध व्यवसायाचे अनुषंगाने कुरेशीनगर येथील अवैध कत्तलखाना वारंवार चर्चेत होता. या ठिकाणावरुन आज पर्यंत अनेक जिवंत गोवंश, गोमांस, जनावरांची शिंगे, जनावरांची कातडी व वाहने जप्त केले होती दाखल झालेल्या गुन्हयामध्ये अनेक आरोपींना अटक करून प्रतिबंधक कारवाई सुध्दा करण्यात आली होती. परंतू त्यांचे बेकायदेशीर कृत्यांना आळा बसलेला नव्हता.
या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१६ मार्च रोजी कुरेशीनगर येथील अनाधिकृत कत्तलखाना पोलिस प्रशासनाकडून पाडण्यात आला. यासाठी दोन जेसीबीच्या सहाय्याने अनाधिकृत कत्तलखान्याचे बांधकाम तोडण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सहा. पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सुरज शिंदे यांच्यासह फलटण शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक आणि वाहतूक शाखेच्या अंमलदाररांसहीत एकूण २६ पोलिस अंमलदार आणि आर.सी.पी पथक यांनी भाग घेतला गेला होता.