सातारा शहराचा समतोल विकास साधण्यास, सातारा विकास आघाडी नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. विकासामध्ये दुजाभाव न करता, आवश्यक कामात सातत्य ठेवून नागरीकांचे हित जोपासत, विकास पर्व उभे करणारी सुविधा ही नागरीकांची आघाडी आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारा : सातारा शहराचा समतोल विकास साधण्यास, सातारा विकास आघाडी नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. विकासामध्ये दुजाभाव न करता, आवश्यक कामात सातत्य ठेवून नागरीकांचे हित जोपासत, विकास पर्व उभे करणारी सुविधा ही नागरीकांची आघाडी आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
प्रभाग क्रमांक २० येथील विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रभागातील नागरीकांशी औपचारिक संवाद साधताना बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अँड. डि. जी. बनकर, नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, माजी नगरसेवक अशोक शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातुन, गेल्या काही वर्षात अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लागली आहेत. जेथे गरज आहे, तेथे कामांना प्राधान्य देत नागरीकांचे हिताला सर्वोच्य प्राधान्य दिले गेले आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक यांच्या विशेष प्रयत्नांमधुन सुमारे ५० ते ५५ लाखांच्या कामांचा शुभारंभ होत आहे. ही समाधानाची बाब आहे, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले.
महात्मा गांधी क्रीडा मंडळ लगत ओढ्यास संरक्षक भिंत बांधणे, चैतन्य कॉलनी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे, माजी नगरसेवक कै.जगन्नाथ चौगुले बंगला ते नंदादिप अपार्टमेंट रस्ता डांबरीकरण करणे, ठक्कर कॉलनी रस्त्याचे डांबरीकरण करणे इत्यादी कामांचा शुभारंभ खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
प्रारंभी नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी प्रभागाच्या वतीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे स्वागत केले. यावेळी अस्लमभाई बागवान, रियाजभाई बागवान, चैतन्य कॉलनी येथील पोरे, सुशांत मोरे, बाळासाहेब चौगुले, ठक्कर कॉलनीमधील रामचंद्र पाटील, प्रकाश जाधव, किरण कदम, मिलींद चिपळुणकर, महात्मा गांधी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रदिपराव गोळे, अमर गोळे, मंगेश गोगावले, साई सावंत, यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते.
दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महात्मा गांधी क्रीडा मंडळाच्या संरक्षक भिंतीचे कामाची पहाणी करुन, समाधान व्यक्त केले, त्याचप्रमाणे गांधी क्रीडा मंडळास सदिच्छा भेट देवून मंडळाच्या इमारतीची व अन्य सोयी सुविधांबाबत संबंधीतांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी मंडळास लागेल ते सहकार्य आम्ही करु असा शब्द देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना दिला.