सद्या जनावरांमध्ये फैलावत असलेल्या लंपी स्किन या रोगा संदर्भात या रोगाची लक्षणे त्यावरील उपचार व त्याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेली भीती यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनजागृती करावी तसेच त्यावरील उपचारासाठी लागणारे औषधे खाजगी औषध दुकानातून योग्य दरात मिळावी यासाठी दर पत्रक लावण्यात यावे व राज्य सरकार मार्फत जनावरांचे मोफत लसीकरण व्हावे यासाठी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी(बेडके) यांच्या सुचनेनुसार गटविकास अधिकारी श्रीमती अस्मिता गावडे पंचायत समिती फलटण यांना निवेदन देण्यात आले यावेळी फलटण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे,युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गंगाराम रणदिवे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री अजिंक्य कदम,अनुसूचित जाती जमाती विभागाचे तालुकाध्यक्ष अभिजीत जगताप,कार्यकारिणी सदस्य अभिलाष शिंदे उपस्थित होते.