फलटण प्रतिनिधी -
माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे तसेच फलटण नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी पैलवान शंभुराज बोबडे यांना सुरवडी गणातून पंचायत समितीची उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी पश्चिम भागातील गावातून होत आहे.
बांधकाम क्षेत्रामध्ये उच्च विभूषित व कमी कालावधीतच आपल्या प्रसाद कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून फलटण शहरासह ग्रामीण भागामध्ये आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे पैलवान शंभुराज परमेश्वर बोबडे अतिशय नावाजलेले नाव असून नुकत्याच जाहीर झालेल्या पंचायत समिती निवडणुकांमध्ये सुरवडी या सर्वसाधारण गणातून शंभूराज बोबडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
घाडगेवाडी परिसरातील नामांकित तथा दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक दशरथ आबा बोबडे या कुटुंबाला एक आगळीवेगळी फलटण पश्चिम भागातील गावांमध्ये ओळख आहे यामुळे दशरथ आबा बोबडे यांचे पुतणे तथा प्रसाद कन्स्ट्रक्षण चे सर्व सर्वे पैलवान शंभुराज बोबडे यांच्या उमेदवारीने भाजपा सह मित्र पक्ष आग्रही असून त्यांच्या उमेदवारीमुळे पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये बोबडे परिवाराचा घराघरात संबंध असून हे कुटुंबीय गेली अनेक वर्ष फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असून पैलवान शंभूराज बोबडे यांना सुरवडी गणातून पंचायत समितीची उमेदवारी मिळावी अशी मागणी घाडगेवाडी परिसरातून होत आहे.











