फलटण प्रतिनिधी -
कोळकी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य पती पत्नी यांचा टेंभुर्नी येथे कार व एसटी बस च्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून या भीषण अपघातात अजून एका महिलेचा मृत्यू तसेच एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे कामगार नेते तथा कोळकी ग्रामपंचायत सदस्य उपकार ऊर्फ बाळासाहेब काशिद(अण्णा) व त्यांच्या पत्नी सौ.सुनीता बाळासाहेब काशिद हे टेंभुर्नी येथे लग्न सोहळ्यासाठी गेले असता त्यांच्या कारचा व एस टी बसचा समोरासमोर अपघात झाला यामध्ये या दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मूळ गाव गोखळी ता.फलटण येथील व सध्या राहणार बुवासाहेब नगर कोळकी चे विद्यमान सदस्य व कारखान्याचे कामगार नेते बाळासाहेब काशिद व त्यांच्या पत्नी यांचा मृत्यू ने फलटण तालुक्यात शोककळा पसरली आहे.स्वराज कुस्ती केंद्राच्या माध्यमातून शेकडो पैलवान त्यांनी घडविले आहेत.











