जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका जाहीर झाली असून नेहमीच जिल्हा परिषदेमध्ये लोकसंख्येने मोठ्या गावातील उमेदवारांचा नेतेमंडळी विचार करतात मग छोट्या गावातील लोकांना कधी उमेदवारी मिळणार?त्यांनी काय गावाची लोकसंख्या कमी असल्यामुळे काय फक्त निवडणुकीत सतरंज्या उचलायच्या का?त्यांच्याच पाट्या लावायच्या का? अन् त्यांचाच सतत जयजयकार करायचा का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सातारा जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय त्यातून गावचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले जातात प्रत्येक पाच वर्षांनी या निवडणुका होतात,(नुकताच प्रशासक म्हणून गेलेला काळ अपवाद म्हणून सोडला तर)त्याच जिल्हा परिषदेच्या सदस्यांतून परत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवडले जातात अन् केंद्र असेल किंवा राज्य सरकार असेल याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो मग हे सदस्य नेहमीच आपल्या स्वतःच्या गावातच जास्तीत जास्त निधी वापरतात हा पण वेगळा अन्याय नेहमीच होतो यामुळे प्रत्येक वेळी मोठ्या गावातच उमेदवारी दिली जाते यामुळे नेहमीच छोट्या गावांवर उमेदवारीचा अन् निधीचा अन्याय दुसरा मग हे कितीवेळा छोट्या गावातील लोकांनी का अन् कशासाठी सहन करायचं असा सवाल मतदारांनी केला असून यावेळी मोठ्या गावांची मक्तेदारी खोडून काढायची असा चंगच त्या छोट्या छोट्या गावातील मतदारांनी केला आहे.
दरम्यान मोठ्या गावात अंदाचे 3 ते 5 हजार लोकसंख्या नक्कीच असते मात्र त्या आसपासच्या छोट्या गावातील लोकसंख्या नक्कीच 5 ते 7 हजार किंवा त्यापेक्षा जास्त असते यामुळे त्यांनी जर विचार केला अन् चर्चेप्रमाणे एकजूट केली तर नक्कीच त्या मोठ्या गावातील उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला जाऊ शकतो अशी चर्चा फलटणमध्ये गावागावात सुरू आहे.











