फलटण प्रतिनिधी –
मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे सुरक्षारक्षक व तरडगावचे सुपुत्र (ता. फलटण) विदीप दिलीप जाधव (वय ३७) यांना विमान अपघातामध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांचे निधन झाले आहे.
कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. मुंबई पोलीस दलामध्ये सेवा बजावत असताना त्यांनी अनेकदा जबाबदारीचे काम अत्यंत निष्ठेने पार पाडले. विमान अपघातामध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले ही घटना अत्यंत वेदनादायक असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
विदीप जाधव यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि असंख्य हितचिंतक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने समाजाने एक कर्तव्यदक्ष जवान गमावला आहे.













