फलटण, दि. २३ :
विडणी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज गुरुवार, दि. २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते उत्तरेश्वर मंदिर, विडणी येथे या प्रचाराचा औपचारिक प्रारंभ होणार असल्याची माहिती विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिली.
विडणी पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सचिन गजानन अभंग (अध्यक्ष ) हे निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांच्या उमेदवारीचे संपूर्ण विडणी गणात उत्स्फूर्त स्वागत होत आहे. विकासाभिमुख नेतृत्व, तरुणाईचा सहभाग आणि भाजपच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर विडणी गणात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील भाजपा–राष्ट्रवादीचे उमेदवार, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विडणी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला अधिक वेग मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.











